शिवसेनेच्या पुणे जिल्हाप्रमुखपदी दौंड तालुक्यातील महेश पासलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महेश पासलकर यांनी दौंड तालुक्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी शिवसेनेचे भव्य कार्यालय उभारून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या सोयीसुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली.जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्याकडे दौंड, इंदापूर या दोन तालुक्यांची स्वतंत्र जबाबदारी असणार आहे.
महेश पासलकर म्हणाले की, शिवसेनेच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ्या विश्वासाने जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी दौंड तालुक्याला दिली आहे. आतापर्यंत केलेल्या चांगल्या कामाची ही पावती असून पुणे जिल्ह्यासह दौंड तालुक्यात महिलांसाठी औद्योगिक वसाहत, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,कृषी महाविद्यालय उभारण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
चौफुला तालुका दौंड येथे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांचा सत्कार करताना शिवसेना कार्यकर्ते.