शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

भोर-महाड मार्गाची दुरवस्था

By admin | Published: May 06, 2015 5:50 AM

भोर तालुक्यातुन जाणारा महाड-पंढरपूर या नव्याने उभारलेल्या राज्य मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्ता ठिकठिकाणी तुटल्याने अरुंद झाला असून मोठे खड्डे पडले आहेत.

भोर : भोर तालुक्यातुन जाणारा महाड-पंढरपूर या नव्याने उभारलेल्या राज्य मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्ता ठिकठिकाणी तुटल्याने अरुंद झाला असून मोठे खड्डे पडले आहेत. साईटपट्ट्या एक ते दोन फुटांनी खोल गेलेल्या आहेत.रस्त्यावरील अनेक ठिकाणच्या पुलाला संरक्षक कठडे, महितीचे फलक नाहीत. वळणावर झाडेझुडपे वाढलेली आहेत. दरडी पडून गटारे मातीने भरलेली आहेत. यामुळे येथे झालेल्या अपघातांमध्ये एका वर्षात ८ जण मरण पावले तर १२ जखमी झाले. रस्त्यावर होणा-या अपघातांचा व वादावादीचा स्थनिक नागरीकांना व पर्यटकांना त्रास सहन करावा लागत असल्याने ते नाराजी व्यक्त करत आहेत. मात्र. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे भोर तालुक्यातुन महाड-पंढरपूर हा कोकणात जाणारा एकमेव मार्ग आहे. हिर्डोशी खो-यातील नीरा देवघर धरणाच्या दोन्ही भागातील ५० ते ६० गावांना जोडणारा मार्ग आहे. भोर ते महाड हे साधारणपणे ७० ते ८० किलोमीटर अंतर असून निगुडघर ते वरांधा घाट भोर हद्दीपर्यतचा ३५ ते ४० किलोमीटरचा पंढरपूर-महाड हा मार्ग राज्यमार्ग आहे. या रस्त्याला मोठे खड्डे पडलेले आहेत तर अनेक ठिकाणच्या खोल गेल्याने दुचाकी वाहनचालकांना रस्त्यावरुन खाली उतरता येत नाही. खडीमुळे वाहने पंक्चर होतात. अनेकदा चारचाकी वाहाने दुचाकी गाडयांना जागा देत नाहीत. यातून अपघात वारंवार घडतात.सन २०१४ ते २०१५ या कालावधीत ९ अपघातात १२ जण किरकोळ व गंभीर जखमी झाले तर ८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रस्त्यावरुन गाडी खाली उतरवण्या वरुन अनेकदा वादावादी होऊन हाणामारी होत आहे. दिवसातून अशा चार ते पाच अशा घटना घडत असून याचा स्थानिक लोकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे हिर्डोशी येथील शेतकरी संदिप धामुणशे यांनी सांगितले ४ कोकणात जाणारा महत्वाचा राज्य मार्ग असून वरंध घाट हा अवघड घाट याच मार्गातून जातो त्यामुळे पावसाळ्या पूर्वी महाड-पंढरपुर रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीने तयारी करणे गरजेचे आहे. मात्र, ठिकठिकाणच्या वळणावरील झाडेझुडपे तोडलेली नाहीत.४ जमिनी खरेदी करणाऱ्या पार्टीवाल्यांनी मुख्य रस्त्यापासून आत रस्ता करताना गटारात माती टाकून ती बुजवली आहेत. पावसाळ्यात दरडी पडून गटारे बुजलेली आहेत यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरून पाणी वाहणार आहे.४ ठिकठिकाणच्या मोऱ्यांना व पुलाला संरक्षककठडे नाहीत, यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या गाडयांचे रात्री अपरात्री अपघात घडतात हिर्डोशी गावाजवळ पुलावरुन गाडी खाली पडल्याची घटना घडली आहे मार्गावर फलकांचाही अभाव४अनेक ठिकाणी महितीचे फलक लावलेले नाहीत. यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडतो. महाड-पंढरपूर मार्गाची दुरवस्था झाली असून पावसाळयापूर्वी फलक बसवणे, दुरुस्ती इत्यादी गोष्टी करणे गरजेचे आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिक व प्रवासी करत आहेत.४भोर- महाड या राज्य मार्गासाठी बजेट मधून सुमारे २ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यातून या ठिकाणी खराब झालेल्या ९ किलोमीटर पर्यतच्या साईडपट्टयांचे काम करण्यात येणार आहे.४या शिवाय राहिलेल्या कामाला पावसाळया नंतर अधिक निधी मंजुर करुन सदरचा रस्ता वाहतुकीस सुरळीत केला जाईल, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.४रस्त्याची कायमस्वरुपी दुरुस्ती झाल्यास नागरिकांना मनस्ताप कायमचा मिटणार आहे.