पिंपरी : मानव संसाधन क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या व्हायब्रंट एचआर संघटनेचा वर्धापन दिन भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पुरस्कार वितरण, कामगार व व्यवस्थापनातील संबंधांचा ऊहापोह, शास्त्रीय संगीताची जुगलबंदी असे कार्यक्रम रंगले. आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेचे (आयएलओ) मुख्य तांत्रिक सल्लागार थॉमस क्रिंग, मराठा चेंबर आॅफ कॉमर्सचे महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख, कामगार उपायुक्त रत्नदीप हेंद्रे, सहायक कामगार आयुक्त संभाजी काकडे, सुनील बागल, आयएलओचे राष्ट्रीय प्रकल्प समन्वयक जी. एल. नरसी, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक, अॅड. श्रीनिवास इनामती, अॅड. राजीव जोशी, अॅड. आदित्य जोशी, प्राचार्य डॉ. विजय वधाई उपस्थित होते. पंडित अजय बक्षी व पंडित ऋषीकेश जगताप यांनी सतार व तबलावादनाची जुगलबंदी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संघटनेच्या वाटचालीचा आढावा शंकर साळुंखे व राम होनप यांनी घेतला. क्रिंग यांनी आयएलओ व व्हायब्रंट एचआर यांच्यामध्ये कामगारविषयक उपक्रमांसाठी करार करण्याची घोषणा केली. कुचिक यांनी ह्यएचआरह्ण हा कामगार व व्यवस्थापन यांच्यातील दुवा असल्याचे सांगितले. डॉ. सरदेशमुख यांनी सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. हेंद्रे व काकडे यांनी औद्योगिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी संघटनेचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद केले. व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून २२ जणांनी सुरू केलेल्या ग्रुपचे रूपांतर २३०० जणांच्या मोठ्या समूहात झाले आहे. ग्रुपचे विविध विभाग आहेत.सुधीर पाटील, शीतल साळुंके, अभिजित शेटे, सचिन गायकवाड, अमित केदारी, बंडू कुंभार, सविता गरुड, सोनाली घोडके, विशाल भांगे, विभावरी लोंढे, रविराज शिंदे, स्मिता नारकर, सुशांत खोत आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
रंगली शास्त्रीय संगीताची जुगलबंदी
By admin | Published: January 22, 2016 12:53 AM