अजितदादांचा फोन अन् १८ तासांपासून रुग्णालयाने बिलासाठी अडकून ठेवलेला मृतदेह ताब्यात मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 06:47 PM2021-06-12T18:47:04+5:302021-06-12T20:10:10+5:30

अजितदादांनी रुबी हॉलमधे एक फोन केला आणि काही क्षणातच कुणाल पावडे या २२ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात मिळाला.

Dead body of kunal Pawade in hand relatives by one call of Ajit pawar, who stuck from 18 hours by rubby hall hospital for a bill | अजितदादांचा फोन अन् १८ तासांपासून रुग्णालयाने बिलासाठी अडकून ठेवलेला मृतदेह ताब्यात मिळाला

अजितदादांचा फोन अन् १८ तासांपासून रुग्णालयाने बिलासाठी अडकून ठेवलेला मृतदेह ताब्यात मिळाला

Next

शेलपिंपळगाव : खेड तालुक्यातील वाडा या गावातील कुणाल पावडे २२ वर्षाच्या युवकास काही दिवसांपूर्वी काविळची बाधा झाली होती. आजार वाढत गेला आणि यकृत प्रत्यारोपण हे ऑपरेशन कुणालचे करण्याचे ठरले. त्यासाठी कुणालच्या बहिणीने यकृतदान देण्याचे ठरवले. त्यानुसार रुबी हॉल येथे यकृत प्रत्यारोपण हे ऑपरेशन झाले. ऑपरेशन झाल्यावर सहा दिवसांतच कुणालची प्रकृती चिंताजनक होत गेली आणि त्याची गुरुवारी ( दि.१० जून) रात्री ९ वाजता प्राणज्योत मावळली.

कुणालची घरची आर्थिक परीस्थीती ही अतिशय नाजुक आहे. कुणाल हा सर्व मित्रपरिवारात लाडका होता. तो होमगार्डमधे कार्यरत होता. यकृत प्रत्यारोपणाचा ३० लाखापर्यंतचा फार मोठा खर्च त्याच्या घरच्यांना पेलावणारा अजिबात नव्हता. कुणालच्या मित्र परिवाराने हा खर्च करण्यासाठी समाजातुन आर्थिक मदत गोळा करायला सुरुवात केली. रुबी हॉलने १० लाख रुपये ऑपरेशनचे होतील आणि २ लाख मेडीसिनचे होतील असे एकूण १२ लाख रुपये भरा म्हणून सांगितले. बाकीची सर्व रक्कम एनजीओ संस्थाकडुन आम्ही घेऊ असे सांगितले. त्यानुसार पावडे कुटुंबाने सदर रक्कम १२ लाख रुपये रुबी हॉलमधे भरले. कुणालचे निधन झाल्यावर झाल्यावर रुबी हॉलने सांगितले की, १२ लाख रुपये हा खर्च फक्त ऑपरेशनचा आहे. तुमचा पेशंट ॲडमिट झाल्यापासून ऑपरेशन सोडून बाकीचा सर्व खर्च ४ लाख रुपये झाला आहे. ही सर्व रक्कम भरेपर्यत कुणालचा मृतदेह ताब्यात देणार नाही म्हणुन त्यांनी पावडे कुटुंबाच्या ताब्यात कुणालचा मृतदेह न देता १८ तास ताटकळत ठेवला. 

पावडे कुटुंबातील सदस्यांनी दिवसभर अनेक प्रयत्न केले. समाजातून तालुक्याच्या प्रतिनिधीपासून ते विविध पक्षाचे अनेक मित्र मंडळीनी कुणालचा मृतदेह ताब्यात मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु रुबी हॉलने उर्वरीत बिलाची रक्कम भरल्याशिवाय मृतदेह देणार नाही ही कठोर भूमिका कायम ठेवली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यामधे आलेले आहेत असे समजल्यावर पावडे कुटुंबाने ही व्यथा शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अजितदादांच्या समोर मांडली. 

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अजितदादांनी रुबी हॉलमधे एक फोन केल्यावर लगेचच कुणालचा मृतदेह पावडे कुटुंबाच्या ताब्यात देतो असे सांगितले. त्यानुसार सायंकाळी ६ वाजता कुणालचा मृतदेह पावडे कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. मृत्युशी झुंज देत असताना कुणालच्या मृत्युनंतरही अंत्यविधी होईपर्यंत पावडे कुटुंबाला संघर्ष करावा लागला.

Web Title: Dead body of kunal Pawade in hand relatives by one call of Ajit pawar, who stuck from 18 hours by rubby hall hospital for a bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.