उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बाजारमैदान हद्दीतील जुन्या विहिरीत रविवारी सकाळी अंदाजे ३५ ते ४० वर्षे वय असलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित मुलाने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ओळख पटविण्याचे काम चालू आहे.उरुळी कांचन येथील बाजारातमैदानावर एक विहीर (बारव) आहे. ही विहीर अनेक दिवसांपासून बंद आहे. विहिरीत मोठ्या प्रमाणात घन व कचरा साठला आहे. नजीकचे नागरिक त्यात कचरा टाकतात म्हणून ग्रामपंचायतीने विहिरीला वरून जाळी बसविली आहे. एक माणूस खाली उतरेल एवढी जागा जाळीला ठेवली आहे. रविवारी आठवडेबाजार असल्यामुळे एक बाजारकरू महिला विहिरीकडे गेली असता, तिला हा प्रकार दिसला. तिने बाजार फी वसुली पथकामार्फत उरुळी कांचन पोलीस चौकीशी संपर्क साधून घटना त्यांना कळविली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोसले यांनी सहकारी व जेसीबी मशिनच्या साह्याने हा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालय, पुणे येथे पाठवला असून पुढील तपास चालू आहे.
उरुळी कांचनच्या बाजारमैदान हद्दीतील जुन्या विहिरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 17:54 IST
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बाजारमैदान हद्दीतील जुन्या विहिरीत रविवारी सकाळी अंदाजे ३५ ते ४० वर्षे वय असलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.
उरुळी कांचनच्या बाजारमैदान हद्दीतील जुन्या विहिरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
ठळक मुद्देसंबंधित मुलाने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा अंदाजससून रुग्णालय येथे मृतदेह पाठवला उत्तरीय तपासणीसाठी