नीरा (पुणे ) : नीरा येथील घातक रसायन निर्मिती करणाऱ्या ज्युबिलंट इंग्रिव्हीया कंपनीमध्ये मेंटेनन्सचे काम सुरू असताना शनिवारी ऍसिड कॉम्प्रेसरच्या दुरुस्तीचे काम करत असताना स्फोट होऊन यामध्ये तीन जण जखमी झाले होते. त्यापैकी एकाचा बुधवारी पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पुरंदर आणि बारामतीच्या सीमेवर असलेल्या कंपनीमध्ये अनेक वेळा अपघात होत असतात. मागील पाच वर्षांपूर्वी झालेल्या अपघात लोकांच्या अजूनही लक्षात असून आज शनिवारी पुन्हा एकदा या कंपनीमध्ये सकाळी ११ वाजलेच्या सुमारास एक स्फोट झाला. इथेनॉल असिट प्लांटच्या मेंटनंसचे काम सुरू असताना हा स्पॉट झाला. कंपनीत शनिवारी (दि.२ रोजी) मेंटेनन्सचे काम सुरू असताना तीन जण जखमी झाले होते. यातील भरत सिंग (वय ३३ वर्षे, रा. बिहार) हे अत्यवस्थ झाले होते. त्यांना कंपनीने तात्काळ पुण्याच्या सुर्या हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा आज बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी नीरा शहरात पसरल्याने कंपनी विषय लोक आता भयभीत झाले होते.
कंपनीच्याच ऑनसाईट इमर्जन्सी टीमने तत्परता दर्शवत लगेचच जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा मिळावी याची कंपनी सात्यत्याने काळजी घेत होती. त्यातील एका व्यक्तीची स्थिती लक्षात घेता जलद आणि चांगली वैद्यकीय सेवा मिळाली यासाठी पुण्यातील सुसज्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वोतपरी प्रयत्न करून सुद्धा ते या परिस्थितीतून बाहेर येऊ शकले नाहीआणि त्यांचा मृत्यू झाला
- इसाक मुजावर (जनसंपर्क अधिकारी ज्युबिलंट इंग्रीव्हीया, नीरा)