पाषाण : बालेवाडी येथील पीएमपीएलचे माजी कर्मचारी पांडुरंग महादेव मांगडे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सांप्रदायिक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान होते. ते कामगार केसरी मल्ल योगेश मांगडे हे यांचे वडिल होत.
विजय गायकवाड
पुणे : समाजवादी चळवळीतील कार्यकर्ते विजय दगडोबा गायकवाड (वय ६७) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातू असा परिवार आहे. गेली काही वर्षे गायकवाड हे आम आदमी पक्षाचे आणि भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे एक उत्साही कार्यकर्ते म्हणून परिचित होते. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे ते पदाधिकारी होते.
सुमती बोरावके
पुणे : सुमती निवृत्ती बोरावके (वय ७९, रा. शिवाजीनगर गावठाण) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
धैर्यशील पवार
पुणे : बालभारतीमधील माजी कामगार नेते धैर्यशील कृष्णराव पवार (वय ८१, रा. बिबवेवाडी) यांचे निधन झाले. पाठ्यपुस्तक मंडळातून ऑफिस सुपेरिटेंडेंट म्हणून ते निवृत्त झाले होते. सलग २० वर्षे ते बालभारती कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश सचिव शेखर पवार यांचे ते वडील होत.
राजेंद्र राऊत
पुणे : प्रा. राजेंद्र सौदागर राऊत (वय ४२, रा. यावली, मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांनी पुण्यात काही काळ अध्यापनाचे काम केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडिल, मुलगी असा परिवार आहे.
सुधीर बनसुडे
पुणे : डॉ. सुधीर मारुती बनसुडे (वय ३५, रा. चंदननगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण, भावजय असा परिवार आहे. उद्योजक राहुल बनसुडे यांचे ते बंधू होत.
राजन भोसले
पुणे : राजन शिवाजी भोसले (वय ४३, रा. हडपसर) यांचे नुकतेच अपघाती निधन झाले .
भोसले यांच्यामागे पत्नी दोन मुले आई वडील व भाऊ असा परिवार आहे. ते गोरखनाथ मित्र मंडळचे अध्यक्ष होते.