पुणे : सुभद्रा वामनराव चौधरी (वय ८७, रा. सोलापूर बाजार) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ कॅम्प विभागाचे सभासद राजेश चौधरी यांच्या त्या मातोश्री होत.
योगेश खरवलीकर
पुणे : योगेश विलास खरवलीकर (वय ३९, रा. कसबा पेठ) यांचे निधन झाले. ते थोरले बाजीराव मंडळाचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात वडील, आई, दोन बहिणी, मेहुणे आणि भाचा असा परिवार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास लक्ष्मण खरवलीकर यांचे ते सुपुत्र होते.
सीताबाई भामे
पुणे : सीताबाई रामचंद्र भामे (वय ६०, वडगाव धायरी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. कडबेआळी मंडळाचे कार्याध्यक्ष जितेंद्र भामे यांच्या त्या मातोश्री होत.