पुणे : प्रगतिशील शेतकरी जगन्नाथ (आबा) दगडू जाधव (वय ८०, साकुर्डे) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. के.जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि केजे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष कल्याण जाधव यांचे ते वडील होत.
वनमाला परदेशी
पुणे : वनमाला परशुराम परदेशी (वय ७०, रा. सिंहगड रस्ता) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. सिनेअभिनेते आणि मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी यांच्या त्या मातोश्री होत.
मिलिंद ढमढेरे
पुणे : व्यावसायिक बाळासाहेब उर्फ मिलिंद रामचंद्र ढमढेरे (वय ५५, रा. मार्केट यार्ड) यांचे अल्पश: निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, विवाहित मुलगी, दोन मुले, सून असा परिवार आहे. अखिल मंडई मंडळाचे सरचिटणीस मोहन ढमढेरे यांचे ते मोठे बंधू होत.
विमलाबाई कोंडे
पुणे : विमलाबाई पांडुरंग कोंडे (वय ८८, रा. शुक्रवार पेठ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, दोन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. अखिल मंडई मंडलाचे माजी उपाध्यक्ष संदीप कोंडे यांच्या त्या मातोश्री होत.
अंकुश सावंत
पुणे: अंकुश बाबूराव सावंत (वय ६२, रा. शुक्रवार पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. ते अनेक वर्षांपासून खेड-शिवापूर येथे टायरचे व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध होते.
शोभा नांगरे
पुणे : शोभा आप्पासाहेब नांगरे (वय ७०, रा. सोमवार पेठ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार विभागाचे लष्कर मतदारसंघाचे अध्यक्ष विनायक नांगरे यांच्या त्या मातोश्री होत.
शोभाताई पायगुडे
पुणे : शोभाताई विलास पायगुडे (वय ६०, रा. थिटेवस्ती) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.