शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

स्वाइन फ्लूसदृश आजाराने शिक्षिकेचा मृत्यू

By admin | Published: June 26, 2017 3:42 AM

स्वाइन फ्लूसदृश आजाराने येथील एका शिक्षिकेचा मृत्यू झाला. गेल्या महिनाभरात स्वाइन फ्लूसदृश तीन रुग्ण मिळाले. यात एका रुग्णाला

लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर : स्वाइन फ्लूसदृश आजाराने येथील एका शिक्षिकेचा मृत्यू झाला. गेल्या महिनाभरात स्वाइन फ्लूसदृश तीन रुग्ण मिळाले. यात एका रुग्णाला स्वाइन फ्लू झाल्याचा अहवाल तपासणीत समोर आला आहे. याचा अर्थ शहरात स्वाइन फ्लूसदृश साथ असण्याची शक्यता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.पल्लवी दिलीप कुलकर्णी (वय ३५, छत्रपती कॉलनी, शिरूर) असे मृत महिलेचे नाव आहे. कुलकर्णी यांना काल दुपारी येथील धारिवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने व स्वाइन फ्लूूसदृश लक्षणे आढळल्याने त्यांना पुणे येथे पाठवण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना केईएम रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना टॅमी फ्लूचे औषध तसेच इतर उपचार सुरू करण्यात आले. मात्र पहाटे पाचला त्यांचा मृत्यू झाला. मागील पंधरा दिवसांत शहरात दोन स्वाइन फ्लूसदृश रुग्ण आढळून आले. या रुग्णांना ताबडतोब उपचार सुरू केल्याचे डॉ. संतोष पोटे यांनी सांगितले. हे दोन्ही रुग्ण बरे झालेत. मागील महिन्यात येथील बालरोगतज्ज्ञ संदीप गुंड यांच्याकडे तीन वर्षांचे बाळ उपचारासाठी आणण्यात आले. त्याला स्वाइन फ्लूूसदृश लक्षणे आढळल्याने केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे बाळाच्या घशातील द्रव तपासणीसाठी एनआयव्हीला पाठवण्यात आला. यात तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. असे अनेक रुग्ण आढळले. मात्र आम्ही तपासणी अहवालाची वाट न पाहता रुग्णावर उपचार सुरू करतो, असे डॉ. गुंड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.