पुणे: मनसे चे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. साईनाथ बाबर हे पुण्यातील एनआयबीएम रोडवरील एका सोसायटीतील राहायला असून त्यांच्याच सोसायटीतील एका महिलेने धमकी दिली असल्याचे समोर आले आहे. हवा पिर खान असे धमकी देणाऱ्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी साईनाथ बाबर यांच्या पत्नी आरती बाबर यांनी कोंढवा पोलिसात तक्रार दिली आहे. बाबर यांचा १६ वर्षाचा मुलगा सोसायटीत खेळत असताना या महिलेने त्या ठिकाणी येऊन शिवीगाळ करत त्याला जिवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यन दोन महिन्यांपूर्वी मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून ३० लाख रुपयांची खंडणी अज्ञातांनी मागितली होती. सोबतच खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याचीही धमकीही दिली होती. रुपेश मोरेला खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याचीही धमकी दिल्यामुळे पुणेपोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली दरम्यान या प्रकरणी मुंबईतून एकाला ताब्यात घेतले होते. "हमने आपके नाम का मॅरेज सटीफिकेट बनाया है, खराडी ऑन आयटी पार्क के सामने इनोव्हा मे २० लाख रुपये रख देना, पोलीस कम्प्लेट किया और इनोव्हा सील हुआ तो देख लेना क्या करते है आपके साथ, और पुलीस कम्लेट करके कुछ नही होने वाला, इम्तीयाज चाचा ने पहीले से सब सेटींग करा है, पुरी चंदननगर पोलीस स्टेशन मॅनेज कर दी है." असा धमकीचा मेसेज होता. त्यानंतर रुपेशने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती.