शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

पुण्याजवळ एसटी-टेम्पोचा भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 7:13 AM

पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ  एसटी आणि टेंम्पोचा भीषण अपघात झाला असून यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे वृत्त आहे.  

पुणे, दि. 28 -  पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ  एसटी आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला असून यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.  एस.टी. आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाल्यामुळे ही भीषण दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कांद्याने भरलेल्या टेम्पो पंक्चर झाल्यामुळे टायर बदलण्यासाठी चालकानं टेम्पो रस्त्याच्या बाजूला उभा केला. यावेळी मुसळधार पाऊस कोसळत होता.  त्यामुळे एस.टी. चालकाला रस्त्याशेजारील टेम्पो दिसला नाही आणि एस.टी. थेट जाऊन टेम्पोला धडली. या अपघात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  नारायणगाव येथील भीषण अपघातात एसटीचा चालक सुदैवाने वाचला. तर अपघातात आयशर टेम्पो चालक, आयशर टेम्पोच्या मदतीसाठी थांबलेला ट्रक चालक यांचा या अपघातामध्ये दुदैवी मृत्यू झाला आहे. ट्रक चालक किशोर यशवंत जोंधळे (वय ४०)  आयशर ट्रकचा चालक रशिद गुलाब पठाण,(वय ३०) , शोभा नंदू पगार (वय ४५), यमुना भिला पगार (वय ५५), संकेत दत्तात्रय मिस्त्री, विकास चंद्रकांत गुजराथी  (वय ५०)  सागर कृष्णलाल चौधरी (वय २७ रा.) अभिकेत जोशी (वय २५)  अशी यात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे असून मृत्यू झालेल्या एका महिलेची अद्याप ओळख पटली नाही, तर जखमींना नारायणगाव ,पिंपरी चिंचवड व आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे , या अपघाताची खबर एस टी चालक संतोष यशवंत गुलदगड (वय 32) रा. पळशी,  ता. बारामती यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली आहे, अशी माहिती स.पो.निरीक्षक ए.एल.गोरड यांनी दिली.

त्रिंबकेश्वर-पुणे या एसटीचा रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये एसटीतील सात प्रवशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. टेम्पोचं चाक बदलणाऱ्या दोघांचा एस.टीनं धडक दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. जखमींची अवस्था पाहता मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, रविवारी नाशिक येथे साखरपुडा आटोपून धुळ्याकडे परतत असताना टायर फुटल्याने क्रूझर गाडी मागून येणा-या मारुती व्हॅनवर आदळून झालेल्या अपघातात दहा जण ठार, तर पंधराहून अधिक जखमी झाले. येवला- मनमाड रस्त्यावर बाभुळगाव शिवारात रविवारी सायंकाळी हा अपघात झाला. तर  अहमदाबादजवळील तागडी गावानजीक जीपचालकाने ओव्हरटेकच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणा-या ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पलिताना या जैन तीर्थस्थळाला निघालेले डोंबिवलीतील 10 भाविक व जीपचालक अशा 11 जणांचा मृत्यू झाला आहे. पर्युषण पर्व सांगतेला एकाच कुटुंबातील भाविकांवर मृत्यूने घाला घातल्याचे कळताच डोंबिवलीत शोककळा पसरली. 

टॅग्स :Accidentअपघात