वालचंदनगर : निमसाखर (ता.इंदापूर ) येथे मानमोडी रोगाने ग्रासलेल्या जवळपास २ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. कर्ज काढून ही गावरान कोंबड्यांची पोल्ट्री उभारण्यात आलेली असल्याने मानमोडी रोगामुळे या कुटुंबाला तब्बल ४ लाख रुपयांचा फटका बसला आहे. त्वरित या मृत्यू पावलेल्या २ हजार कोंबड्यांचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी घटनाग्रस्त कुटुंबाकडून करण्यात आली आहे. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, निमसाखर हद्दीतील शेखवस्ती येथील रहिवासी असलेले बबन दिलावर शेख यांनी गावरान कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म उभारले होते . परंतु, सोमवारी एक कोंबडी जागेवर मृत्यू झाला. कालांतराने एकापाठोपाठ सर्वच कोंबड्या मान टाकू लागल्यामुळे शेख यांनी हतबल होऊन डाँक्टरांना संपर्क केला. त्यावेळी डॉक्टरांनी हे मानमोडी रोगाचे लक्षणे सांगितले. बघता बघता दिवसातून जवळजवळ दोनशे ते तीनशे कोंबड्या जागेवर पाय खोरून मृत्यूमुखी पडल्या. तीन दिवसांत जवळजवळ संपूर्ण पोल्ट्रीतल्या संपूर्ण कोंबड्यांचा मृत्यू झाला. शेख म्हणाले, तीन महिन्यांपूर्वी २० रुपये दराने दोन हजार छोटी पिल्ले खरेदी करण्यात आले होते. साधारणपणे पालन पोषण करून एक कोंबडी तीन महिन्यात १ ते दीड किलो वजन भरेल एवढया मोठ्या होतात. त्याचप्रमाणे या खरेदी केलेल्या कोेंबड्यांची वाढ झाली होती. रविवारी या कोंबड्यांना खरेदी करण्यासाठी व्यापारी येणार होता.त्यामुळे शेख कुटूंबाची आर्थिकदृष्ट्या होणारी पिळवणूक थांबणार होती. मात्र, या दुर्दैवी घटनेने शेख कुटूंब आर्थिक कोंडीत सापडले आहेत. शासकीय आर्थिक मदत मिळाल्यास शेख कुटूंबाला मदत होणार आहे. -----------------------------------------------
निमसाखर येथे मानमोडी रोगामुळे दोन हजार कोंबड्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 8:06 PM
मानमोडी रोगामुळे पोल्ट्री फार्म कुटुंबाला तब्बल ४ लाख रुपयांचा फटका बसला आहे.
ठळक मुद्देतीन महिन्यांपूर्वी २० रुपये दराने दोन हजार छोटी पिल्ले खरेदी करण्यात आले होते.मृत्यू पावलेल्या कोंबड्यांचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी घटनाग्रस्त कुटुंबाकडून मागणी