या प्रकरणी नरेंद्र रामगरीब वर्मा (वय २६) याने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नरेंद्र वर्मा हे सनराईज कंपनीमध्ये रात्रपाळीच्या कामासाठी गेले होते. त्याच्यासोबत हेल्पर म्हणून अरविंद वर्मा आणि संदीप कुमार चर्मकार दोघे होते. कंपनीतील प्रोसेसिंग रूममध्ये काॅस्टीक केमिकलच्या बॅचचे काम सुरू होते. केमिकल स्क्रू कनव्होअर मशिनद्वारे रिअॅॅॅक्टर मध्ये टाकण्यासाठी अरविंद वर्मा व संदीप कुमार चर्मकार हे स्क्रू कनव्होअर मशीन चालू करण्यासाठी रिअॅॅॅक्टर जवळ घेण्याची तयारी करीत होते. स्क्रू कनव्होअर ओढताना मशीनचा स्टीलचा पाईप टेम्प्रेचर कंट्रोलचे इलेक्ट्रिक लाईटच्या वायरला धडकून वायर तुटला. यामुळे विजेचा प्रवाह हा स्क्रू कनव्होअर मशिनमध्ये आला. यामुळे संदिप कुमार चर्मकार याला विजेचा धक्का लागला. प्रोसेसिंग रूममधील विद्युत प्रवाह बंद केल्यावर संदीप जमिनीवर पडला. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
फोटो ओळ :- मयत संदीप कुमार चर्मकार