कर्जमाफीची घोषणा ही फसवणूक - पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 11:53 PM2018-08-17T23:53:53+5:302018-08-18T00:14:00+5:30

शासनाने संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. नुसत्या घोषणा देत शासन कामाचा पाढा मोजत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

The debt waiver announcement is fraud - Pawar | कर्जमाफीची घोषणा ही फसवणूक - पवार

कर्जमाफीची घोषणा ही फसवणूक - पवार

Next

का-हाटी - शासनाने संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. नुसत्या घोषणा देत शासन कामाचा पाढा मोजत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
माळवाडी फोंडवाडा (ता. बारामती) येथील विविध विकास कामांचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री पवार यांचे हस्ते करण्यात आले. पवार यांनी शासन शेतकºयांच्या हिताचा कोणताही निर्णय घेत नसल्याची खंत यावेळी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी मिनोगत व्यक्त केले. यावेळी संभाजी होळकर, पुरुषोत्तम जगताप, शारदा खराडे, जयवंत पिसाळ, यशोवर्धन पवार, संजय झगडे, राजाराम पिसाळ, काºहाटीचे सरपंच बी. के. जाधव उपस्थित होते. सरपंच सतीश पिसाळ यांनी प्रास्ताविक केले.
या वेळी जागा दिल्याबद्दल माणिक बोरावके यांचा तसेच माजी सरपंच ईश्वर दगडे, ज्ञानदेव लोणकर यांचा ग्रामसेविका रूपाली लोणकर यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी सरपंच सतीश पिसाळ, उपसरपंच अलका बोरावके, शिरीष लोणकर, रोहिदास रासकर, रूपाली रासकर, शैला लोणकर, रूपाली लोणकर उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. एम. पिसाळ यांनी केले.

- नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामसचिवालयाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच फोंडवडा येथील पिकअप शेड, स्वागत कमान, बारामती तालुका सहकारी दूध संघ मर्यादित बल्क कुलर तसेच जलशुद्धीकरण केंद्र, अंगणवाडी इमारत, व्यायामशाळा, नियोजित कबड्डी स्टेडियमचे उद्घाटन व भूमिपूजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: The debt waiver announcement is fraud - Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.