पुणे : शेतकºयांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. सत्तेवर आल्यावर आम्ही लगेच दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असणाºया शेतकºयांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला. आता, दोन लाख रुपयांवर थकबाकी असणाºया शेतकºयांना कर्जमाफी देण्याचा विचार असून, त्याची माहिती बँकांकडून मागविली आहे. तसेच कर्ज भरणाºयांसाठी देखील विशेष योजना आणली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने दिल्या जाणाºया ऊस भूषण पुरस्कारांचे वितरण ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी झाले. या वेळी ते बोलत होते. व्हीएसआयचे अध्यक्ष माजी कृषी मंत्री शरद पवार, सहकार मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील आदी या वेळी उपस्थित होते. साखर तंत्रज्ञान, साखर अभियांत्रिकी हे सगळे विषय माझ्या डोक्यावरून जाणारे आहेत. त्यामुळे साखर क्षेत्रासंबंधातील काही चुकीचे शब्द आल्यास त्यासाठी माझ्या वडिलांचे मित्र (शरद पवार) हेच त्यासाठी जबाबदार असल्याची मिष्कील टिप्पणी करीत ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात केली. कमीत कमी जागेमध्ये अधिकाधिक उत्पादन घेतले जाते. त्या प्रमाणे आम्ही कमीत कमी जागांमध्ये मुख्यमंत्री करुन दाखवला. त्यामुळे आमच्याकडे जास्त जागा असे कोणी म्हणू नये असा टोलाही ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला. शरद पवार म्हणाले, या पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी व्हीएसआयला जालन्यात जागा देण्याचे दिलेले आश्वासन ठाकरे पूर्ण करतील, अशी आशा व्यक्त केली. यावर मुख्यमंत्र्यांनी जालन्यात व्हीएसआयची शाखा उभारणारच असा शब्द दिला. पुढील कॅबिनेट बैठकीत त्याचा प्रस्ताव आणण्याची सूचनाही केली.ती चूक मी करणार नाही; नाव न घेता मोदींवर टीकाकार्यक्रमात एका व्यक्तीने पवारांचे बोट धरुन राजकारणात आलो असल्याचे धांदात खोटे विधान केले होते. ती चूक मी करणार नाही, असा टोला पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता ठाकरे यांनी लगावला. तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी व्हीएसआयला जालन्यात जमीन देण्याचे कबूल केले होते. त्यावेळी त्यांनी नुसतीच बोलाची कढी, बोलाचा भात केला. त्यावर फोडणी देणार कोण? असा सवाल करीत माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली.मी राष्ट्रवादीतच : विजयसिंह मोहिते-पाटीलमाजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी व्यासपीठावर आल्यानंतर शरद पवार यांनी त्यांना शेजारी बसवून घेतले. कार्यक्रमानंतर पत्रकारांनी मोहिते पाटील यांना विचारले असता, मी राष्ट्रवादीतच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.ऊस भूषण पुरस्काराचे मानकरी उत्पादन (प्रतिहेक्टरी टन)संपत पाटील, हातकणंगले,कोल्हापूर (पूर्व हंगामी) : ३५३अजिंक्य ठाकूर, खेड,पुणे (सुरु हंगाम) : २६५.६८जगन्नाथ भगत, कडेगाव,सांगली- (खोडवा) : २७५.०२सर्वोत्कृष्ट साखर कारखाना :दौंड शुगर, ता. आलेगाव, पुणेउद्योजकता पुरस्कार : क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड, ता. पलूस, सांगलीसर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन :कर्मयोगी अंकुशराव टोपे, ता. अंबड, जालनाऊस विकास व संवर्धन पुरस्कार : भीमाशंकर, ता. आंबेगाव, पुणेपर्यावरण संवर्धन पुरस्कार :जवाहर, ता. हातकणंगले, कोल्हापूरआसवानी पुरस्कार :सोमेश्वर, ता. बारामती, पुणे