शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

अखेर डेक्कन क्वीनची खानपान सेवा खासगी कंत्राटदाराकडे; डायनिंग कारही बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 7:15 PM

पुणे-मुंबई दरम्यान धावणार्‍या प्रतिष्ठित डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारमधील खानपान सेवा अखेर खासगी कंत्राटदाराच्या  ताब्यात गेली आहे़.

ठळक मुद्देरेल्वे बोर्डाचे कर्मचारी देखील बदलण्यात येणार असून खासगी कंत्राटदाराचे कर्मचारी नेमण्यात येणारही खानपान सेवा व्हरायटी पॅन्ट्री सर्व्हिसेस या कंपनीला मिळाली १६ लाख ५१ हजार रुपयांत

पुणे : पुणे-मुंबई दरम्यान धावणार्‍या प्रतिष्ठित डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारमधील खानपान सेवा अखेर खासगी कंत्राटदाराच्या ताब्यात गेली आहे़.रेल्वे बोर्डाकडून खानपान सेवा काढण्यात आली असून बुधवारपासून खासगी कंत्राटदाराकडे त्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाचे कर्मचारी देखील बदलण्यात येणार असून खासगी कंत्राटदाराचे कर्मचारी नेमण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.  रेल्वे बोर्डाने  २८ सप्टेंबर रोजी डेक्कन क्वीनसह हावडा-यशवंतपूर एक्स्प्रेस, निजामुद्दीन गरीब रथ, चेन्नई एक्स्प्रेस, अवध एक्स्प्रेस या रेल्वेंच्या केटरिंग सर्व्हिस चालविण्याविषयीची मर्यादित निविदा काढण्यात आली होती. डेक्कन क्वीनची खानपान सेवा व्हरायटी पॅन्ट्री सर्व्हिसेस या कंपनीला १६ लाख ५१ हजार रुपयांत मिळाली आहे. कमी अंतराच्या मार्गावरील गाड्यांमधील पेट्री कार काढून टाकण्याचा निर्णय मध्यतरी रेल्वेने घेतला होता़ त्यानुसार डेक्कन क्वीनची डायनिंग कार काढण्यात आली होती़ परंतु, प्रवाशांचा विरोध लक्षात घेऊन रेल्वेने नवीन अत्याधुनिक डायनिंग कार जोडली होती़ आता मात्र, त्यांनी या डायनिंग कारचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला़ डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारमधील खानपानसेवेचे खासगीकरण झाल्यामुळे प्रवाशांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे. आता ही डायनिंग कार जावून पुन्हा एकदा जुनी पॅन्ट्री कार तिला जोडण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. 

 

डेक्कन क्वीन १ जून १९३० पासून सुरु झाली़ इंग्रज सरकारने ही डायनिंग कार सुरु केली होती़ आता रेल्वे प्रशासन चालवत होते़ तिची सेवा उत्कृष्ट होती़ कोणाचीही तक्रारही नव्हती़ तरीही तिचे खासगीकरण करण्याचा रेल्वेचा निर्णय चुकीचा आहे़ आताच या डायनिंग कारचे सुशोभीकरण वाया जाणार आहे़ रेल्वेचा हा पूर्णपणे चुकीचा निर्णय आहे़- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीPuneपुणे