पुणे : बहुप्रतीक्षित मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन नव्या पेहरावात बुधवारी रात्री पुण्यात दाखल झाली. दोन महत्त्वाच्या शहरांना सेवा देण्यासाठी डेक्कन क्वीन ओळखली जाते. बुधवारी (दि. २२) संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास डेक्कन क्वीन मुंबईहून निघाली आणि रात्री साडेआठच्या सुमारास पुण्यात दाखल झाली.
नव्या डेक्कन क्वीनचा नुसता रंग बदलेला नसून यामध्ये नव्याने एलएचबी कोच, एलएचबी विस्डम कोच आणि एलएचबी डायनिंग कार असे १६ डबे असणार आहेत. एलएचबी कोचमुळे रेल्वे अपघाताचे प्रमाण कमी होते तर अपघात झालाच तर डबे लाइटवेट असल्याने एकमेकांवर चढत नाहीत, असे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.
पुण्यातून डेक्कन क्वीन गुरुवारी सकाळी सव्वासातला निघणार असून, साडेदहाच्या सुमारास ती मुंबईला पोहोचेल, अशी माहिती रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी दिली.