शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

दगडूशेठ मंदिराजवळ ९ वर्षांपूर्वी झालेल्या घटनेसंदर्भातील फेरतपासणी याचिकेवर २ महिन्यात निर्णय घ्या

By नम्रता फडणीस | Published: July 05, 2023 7:01 PM

दगडूशेठ गणपती मंदिराजवळ स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर बुधवार पेठ याठिकाणी नऊ वर्षांपूर्वी दुचाकींचा बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली होती

पुणे : दगडूशेठ गणपती मंदिराजवळ स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर बुधवार पेठ याठिकाणी नऊ वर्षांपूर्वी  दुचाकींचा बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली होती.  याप्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने संशयित पाच आरोपी पोलीस चकमकीत ठार झाल्याचे सांगत संबंधित प्रकरणाचा तपास थांबवलेला होता. मात्र पुण्यातील प्रसिद्ध वकील तौसिफ शेख यांनी या घटनेचा फेरतपास करण्याची मागणी पुणेन्यायालयात केली. त्यावर कोणताच निर्णय न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी दाद मागितली असता न्यायालयाने पुणे न्यायालयाला या फेरतपासणी याचिकेच्या संदर्भात दोन महिन्यात निर्णय घ्यावा असे आदेश दिले आहेत. 

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सारंग कोतवाल यांनी हा आदेश दिला. याबाबत तौसिफ शेख यांनी सांगितले की,जुलै 2014 रोजी बुधवार पेठ याठिकाणी बॉम्बस्फोटाची घटना घडली. या घटनेमध्ये सहा मोटरसायकलींचे नुकसान झाले तर सहा व्यक्ती जखमी झालेल्या होत्या. याप्रकरणात पोलिसांनी दोन महिने तपासात कोणतीही प्रगती केली नाही. त्यानंतर सदर तपास एटीएसला वर्ग करण्यात आला. एटीएसने या प्रकरणाची चौकशी करून मोहम्मद अजाजुद्दीन उर्फ अरविंद, आनंद उर्फ शेख मेहबूब शेख इस्माईल उर्फ गुड्डू ,किसन उर्फ झाकीर हुसेन बदल हुसेन, पप्पू उर्फ अमजद खान उर्फ दाऊद रमजान खान, संतोष उर्फ बिलाल उर्फ अस्लम मोहम्मद खान पाच आरोपींची नावे निश्चित केली. संबंधित संशयितांवर बॉम्बस्फोटाचे आरोपही ठेवण्यात आले. मात्र, या आरोपींना महाराष्ट्रातील कोणत्याही न्यायालयात एटीएस कडून हजर केले गेले नाही. दरम्यान मध्यप्रदेश ,ओरिसा आणि हैदराबाद याठिकाणी कारागृहातून पळून गेल्याचे सांगत पोलीस चकमकीत संबंधित आरोपी ठार झाल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले. त्यानंतर 23 जून 2017 रोजी एटीएस ने याबाबतचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आणि त्याच दिवशी न्यायालयाने संबंधित केसची सुनावणी बंद केली. मात्र, याबाबत 30 नोव्हेम्बर 2017 रोजी मी न्यायालयात याचिका दाखल करून संबंधित केसचा फेरतपास करण्यात यावा असे सांगितले.  

आरोपी हे कर्नाटकातील धारवड याठिकाणी शिवाजी कुलकर्णी नावाच्या व्यक्तीकडे भाडेकरू म्हणून राहत होते. संबंधित घर मालकाचे आधारकार्ड मतदारकार्ड वापर करून त्यांनी बॉम्बस्फोटासाठी मोबाईल सिम कार्ड वापरण्याचे निष्पन्न झालेले आहे. मात्र,एटीएसने त्यांना जबाब देऊन सोडलेले आहे. तसेच या प्रकरणात नेमक्या आणखी कोणाचा सहभाग आहे याबाबत तपासून यंत्रणेने चौकशी केलेली नाही. त्यामुळे यासंदर्भातला फेरतपास व्हावा अशी मागणी पुणे न्यायालयाकडे मी केली होती. मात्र, त्यावर कोणताही निर्णय चार वर्षे घेण्यात न आल्याने अखेर  2022 मध्ये याबाबत मी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून फेर तपासाची मागणी केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने पुणे न्यायालयाला संबंधित याचिका दोन महिन्यात निकाली काढण्यास सांगितलेले आहे.

टॅग्स :PuneपुणेDagdusheth Templeदगडूशेठ मंदिरPoliceपोलिसCourtन्यायालय