पुणे : जगभरात ओमायक्रॉन या नव्या विषाणूने हाहाकार माजवला आहे. तब्बल ३० पेक्षा जास्त देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. हा विषाणू जास्त धोकादायक नसला तरी वेगाने पसरत आहे. यावर लस किती प्रभावी आहे याबाबत अजूनही संशोधन सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वच देश खबरदारी घेऊन लागले आहेत. भारतातही राज्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसऱ्या डोसबाबत केंद्र सरकारने निर्णय घ्यावा असे सांगितले आहे. पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
पवार म्हणाले, बूस्टर डोस संदर्भात आज झालेल्या बैठकीत टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी काही सूचना दिल्या आहेत. सर्वप्रथम आम्ही दोन्ही डोस कसे देता येतील या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. कारण दोन्ही डोस घेतलेल्यांना या विषाणूचा फार काही त्रास होत नसल्याचे आढळून आले आहे. तर काही प्रकरणात ज्या भागात बूस्टर डोस देण्यात आले आहेत. तेथील नागरिकांना थोड्या प्रमाणात त्रास झाला. परंतु बुस्टर डोस द्यायचा असेल तर त्याचा निर्णय देशपातळीवर घेतला गेला पाहिजे. कारण देशाच्या पंतप्रधानांनी आणि केंद्र सरकारने दोन डोस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याप्रमाणे तिसरा डोस द्यायचा असेल. तर सिरम इन्स्टिट्यूटकडे तो उपलब्ध आहे. त्यामुळे आधी दोन्ही शंभर टक्के देऊ आणि त्यानंतर बूस्टर डोसचा विचार करता येईल. केंद्र सरकार बुस्टर डोसबाबत निर्णय घेऊ शकते असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
नागरिकंनी दुसरा डोस त्वरित पूर्ण केला पाहिजे
कोव्हीड बाबात आढाव घेतला आहे. आता ओमायक्रॉन बद्दल चर्चा सुरू आहे. राज्य शासन आढाव घेत आहे. पुण्यात १ कोटी ३८ लाख लसीकरण झाले आहे. शंभर टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. प्रशासन या विषाणूच्या पार्श्वभूमीवर सज्ज असले तरी नागरिकंनी दुसरा डोस त्वरित पूर्ण केला पाहिजे. बाहेरच्या देशातून आलेल्या आणखी लोकांना शोधण्याचे सुरू आहे. पहिला डोस जिल्हयात शंभर टक्के झाला आहे. दहा दिवसात लसीकरण वेग वाढला तर दैनंदिन ६० हजारापेक्षा जास्त लसीकरण होईल. नागरीक अगोदर गंभीर नव्हते आता ते नागरिक जागरूक झाले आहेत.