—उपमुख्यमंत्री अजित पवार
अजित पवार : स्थानिक पाळतीवर महायुती असेलच असे नाही
---
बारामती : ‘ राज्यातील काही जिल्ह्यात व शहरात कुठे काँग्रेसची, कुठे शिवसेनेची तर कुठे राष्ट्रवादीची ताकद आहे. यामध्ये प्रत्येकाकडून अधिक जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा केली जाते. अशावेळी स्थानिक पातळीवरच याबाबतचा निर्णय होण्यासाठी राष्ट्रवादीकडून त्या-त्या जिल्ह्यातील नेत्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भातील निर्णय सोपवण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामती येथे आयोजित दौऱ्यात उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी पवार म्हणाले, राज्यात सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन पक्षांचे सरकार आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या पक्षांची कमी-अधिक प्रमाणात ताकद असते. त्यामुळे स्थानिक पातळीवरील निवडणुकीसंदर्भात कोणाशी आघाडी करायची याबाबतचे अधिकार राष्ट्रवादीकडून त्या-त्या जिल्ह्याला देण्यात येतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा पातळीवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले.
‘महिला अत्याचाराविरोधात लवकरच कायदा’ महिलांवरील अन्याय अत्याचाराला आळा घालण्याच्या दृष्टीने शक्ती कायद्याची तरतूद करण्यात आली आहे. हा कायदा आगामी अधिवेशनापर्यंत अस्तित्वात यावा. या कायद्यामुळे महिलांना सुरक्षित वाटेल व चुकीच्या प्रवृत्तींना आळा घालता येईल. यासंदर्भात एक समिती नेमली असून त्यांच्या अनेक बैठका झाल्या आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हा कायदा लवकर अस्तित्वात येण्यासाठी लक्ष घातल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
——————————————