पुण्यात लॉकडाऊन (Lockdown ) होणार की नाही यावर उप मुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बैठकीत ठोस असा काहीच निर्णय होऊ शकला नाही. पुण्यात 1 एप्रिल ते 14 एप्रिल काळात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी प्रशासन करत होते. मात्र, अजित पवारांसह आयएएस अधिकाऱ्यांनी त्यास विरोध दर्शविल्याने १ एप्रिलआधी आणखी एक बैठक घेण्याचे ठरले आहे. यामुळे तुर्तास पुण्यात लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (No lockdown Decision taken in Pune till 1 april. )
आरटीपीसीआर चाचण्याचे अहवाल येण्यासाठी तीन-चार दिवसांचा कालावधी लागत आहे. नेमके किती ‘खरे’ पॅाझिटिव्ह आहेत याचा आढावा आता घेतला जाणार आहे. खासगी प्रयोगशाळेकडून दिल्या जाणाऱ्या अहवालाची तपासणी आता त्रयस्थ संस्थेमार्फत केली जाणार आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासुन रुग्ण संख्या प्रचंड वाढत आहे. दर दिवशी ६ हजारांच्या पुढे ही रुग्णवाढ गेली आहे. यातल्या अनेक जणांच्या चाचण्या खासगी प्रयोगशाळेत केल्या जात आहेत. यातल्या अनेक लोकांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे आता खासगी प्रयोगशाळा आयसीएमआरचे निर्बंध पाळतात का याची तपासणी आता केली जाणार आहे. आज एकुण रुग्णसंख्या लक्षणे याचा आढावा घेण्यात आला. त्यात हा निर्णय घेतला गेला आहे.
आजच्या बैठकीत पुण्यात कडक लॉकडाऊन करावा अशी मागणी प्रशासनाने केली. मात्र, यास अजित पवारांनी विरोध दर्शविला. यापेक्षा निर्बंध अधिक कडक करण्याबाबत चर्चा झाली. मात्र, पुण्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहून १ एप्रिलआधी आणखी एक आढावा बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये पुण्यात लॉकडाऊन करायचा की नाही यावर निर्णय घेण्याच येण्याची शक्यता आहे.
परिस्थिती गंभीर, मास्क, फिजिकल डिस्टन्स ठेवावं लागणार आहे . पुण्यात आकडेवारी वाढत आहे. 50 टक्के खासगी बेड ताब्यात घेण्यात येणार असून 16 लसीकरण केंद्र शहर आणि ग्रामीण भागात आहेत, ती दुप्पट करण्याचा प्रयत्न असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.