आळे, संतवाडी, कोळवाडी येथील शेतकरी वर्गाच्या दोन बैठका यापूर्वी झाल्या. रविवारी अथर्व मंगल कार्यालयात याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जुन्नर तालुक्यासह खेड, आंबेगाव, पूर्व हवेली येथील गावातील बाधित शेतकरी या वेळी उपस्थित होते. बागायती सुपीक जमिनी पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी जाणार असल्याने शेतकऱ्यांनी हा रेल्वे मार्ग होऊ दिला जाणार नाही, असा निर्धार व्यक्त करत जमिनीच्या मोजणी करण्याचा प्रयत्न केला, तर तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला.
या वेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नीलेश भुजबळ, पाटील बुवा गवारी, राज्य युवा शेतकरी क्रांती संघटनेचे प्रसाद घेनंद, कोळवाडी सरपंच शैलाताई गाढवे, हिवरे खुर्द सरपंच शिंदे, संतवाडी सरपंच नवनाथ निमसे, संदीप डावखर, उदय पाटील भुजबळ, अजित सहाणे, शरद गाढवे, दिगंबर घोडेकर, योगेश कोरडे, नामदेव कुऱ्हाडे, शिवाजी पाडेकर, नवनाथ गायकवाड, तबाजी कोरडे, मारुती लेंडे, योगेश काडेकर, गणेश गुंजाळ, अजित लेंडे, बाळासाहेब लेंडे, शिवदास खोकराळे, वैभव शिंदे तानाजी कुतळ, वसंत लेंडे, सुभाष वाघोले, अनिल वाघोले, भाऊसाहेब भुजबळ यांचेसह शेतकरी आदी उपस्थित होते. या बैठकीत रेल्वे विरोधी संघर्ष कृती समिती स्थापन करण्यात आली. रेल्वे मार्गासाठी विरोध करण्यासाठी आळेफाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी वर्गाने बैठकीत शेवटी घेतला. प्रास्ताविक अनिल वाघोले यांनी केले. आभार दिनेश शिंदे यांनी मानले.
आळे येथील पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी जमिनी संपादित होणाऱ्या शेतकरी वर्गाची बैठक.