पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७० जणांची जंबो पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समन्वय समितीने ही निवड केली आहे.शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पत्रकार परिषद घेऊन कार्यकारिणी जाहीर केली. त्यात एक खजिनदार, एक वरिष्ठ उपाध्यक्ष, १२ उपाध्यक्ष, २५ सरचिटणीस, १७ चिटणीस, एक प्रसिद्धिप्रमुख, ११ समन्वय समिती सदस्य, तीन ब्लॉक अध्यक्षांचा समावेश आहे. समितीत जुन्याच अनेक ज्येष्ठ नगरसेवक, माजी नगरसेवक, माजी महापौर, माजी विरोधी पक्षनेते आदी कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. तीन विधानसभानिहाय ब्लॉक अध्यक्षांची निवड केली आहे. त्यात विष्णू नेवाळे (भोसरी ब्लॉक), बाळासाहेब साळुंखे (पिंपरी ब्लॉक), संदेश नवले (चिंचवड ब्लॉक) यांचा समावेश आहे. कार्यकारिणी पद आणि नाव यानुसार : अध्यक्ष : सचिन साठे, खजिनदार : राजेंद्रसिंग वालिया, वरिष्ठ उपाध्यक्ष : कविचंद भाट. उपाध्यक्ष: राजाभाऊ गोलांडे, हरिदास नायर, रामचंद्र माने, गौतम आरकडे, बाळासाहेब वाल्हेकर, विद्या नवले, अख्तर चौधरी, श्याम अगरवाल, संदीपान झोंबाडे, जनार्दन पोलकडे, तानाजी काटे, सुरेश लिंगायत.सरचिटणीस : भाऊसाहेब मुगुटमल, किरण जैन, मेहताब इनामदार, सुमित्रा पवार, रविराज साबळे, नामदेव नाणेकर, हरेष बोधानी, सज्जी वर्की, तुकाराम भोंडवे, वामन ऐनिले, क्षितीज गायकवाड, सद्गुरू कदम, सचिन कोंढरे, दिनेश भालेकर, बाबा बनसोडे, वसंत गावडे, किशोर कळसकर, शकुंतला बनसोडे, लक्ष्मण दळवी, हिरामण खवळे, राजाराम भोंडवे, सचिन निंबाळकर, हिम्मतराव जाधव, सुनील राऊत, नाझिया बारस्कर. चिटणीस : सागर धावडे, अर्चना मिश्रा, मकरध्वज यादव, उमेश बनसोडे, वसंत मोरे, सतीश भोसले, सुरेश बारणे, गौतम रोकडे, गौतम ओहोळ, प्रतापसिंह खैरारिया, बाळू कुसाळकर, अनिरुद्ध कांबळे, अभिजीत कारखानीस, तुकाराम उदगीरे, संजय कातळे, शोभा कोराते, विमल कुदळे. प्रसिद्धिप्रमुख : संग्राम तावडे. पत्रकार परिषदेस भाऊसाहेब भोईर, राहुल भोसले, विनोद नढे, ज्योती भारती, श्यामला सोनवणे, कविचंद भाट उपस्थित होते. (प्रतिनिधी)
काँग्रेसची जंबो कार्यकारिणी जाहीर
By admin | Published: March 02, 2016 12:55 AM