पुणे : उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येणे बंद झाले आहे, त्यामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. थंडीची तीव्रता कमी होत असून, किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअसच्या वरच राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. सकाळी थंडी जाणवत असून, दुपारी मात्र उन्हाचा कडाका आता हळूहळू सुरू झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आली होती. तिथे बर्फवारी आणि पाऊसही काही ठिकाणी पडत होता. परिणामी महाराष्ट्राकडे थंड वारे वाहत होते. त्यामुळे कडाक्याची थंडी पडत होती. ती आता काही अंशी कमी झाली असून, किमान तापमानातही वाढ झाली आहे. सोमवारी पुण्यातील किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले. दुपारी चांगलेच उन्ह जाणवत आहे.
राज्यात उत्तरेकडील थंड वारे येत नसल्याने राज्यातील किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या वर सरकला आहे. गारठाही कमी झाला आहे. आजपासून राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. सध्या उत्तर भारतामधील थंडीचा कडाक्यात कमी अधिक प्रमाण होत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तरखंड येथे हिमवृष्टी होण्याची शक्यता असल्याने आणि उत्तर भारतामधील राज्यांमध्ये पहाटे दाट धुके पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
पुणे शहरातील किमान तापमानएनडीए : १५.५शिवाजीनगर : १६.२पाषाण : १७.१हडपसर : १९.४मगरपट्टा : २१.५वडगावशेरी : २२.३
शहरातील हवामान कोरडे झालेले असून, किमान तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअस वाढ झाली आहे. उत्तरेकडील वाराही सुरू झाल्याने आज रात्रीपासून किमान तापमानात घट होण्यास सुरवात होईल. हवामान बदलून उष्णता वाढू लागेल.
- अनुपम कश्यपमी, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग