शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

महापालिकेच्या हद्दीतील एड्सग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 1:52 PM

एड्स आजार होण्यामध्ये सर्वाधिक प्रमाण कामगार, वेठबिगार, बांधकाम कामगार, देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया, चालक अशा नागरिकांचे आहे.

ठळक मुद्दे जनजागृतीवर भर : औषधे आणि समुपदेशनाचा होतोय उपयोगगेल्या तीन वर्षात ४ हजार ९६५ जणांना या आजाराची बाधा, २२१८ स्त्रियांचा समावेशतपासणी केल्यानंतर जर रोगनिदान झालेच तर तातडीने उपचार सुरु

पुणे : जनजागृती, समुपदेशन आणि औषधांच्या नियमित सेवनामुळे महापालिका हद्दीतील एड्सग्रस्त रुग्णांची संख्या घटली आहे. २०१६ च्या तुलनेत २०१८ ची आकडेवारी घटली असली तरी २०१७ च्या तुलनेत वाढल्याचे चित्र आहे. गेल्या तीन वर्षात ४ हजार ९६५ जणांना या आजाराची बाधा झाली असून यामध्ये २२१८ स्त्रियांचा समावेश आहे. यातील २०९ स्त्रिया गर्भवती असल्याचेही समोर आले आहे. हा आजार होण्यामध्ये सर्वाधिक प्रमाण अल्प उत्पन्न गटातील तसेच कामगार, वेठबिगार, बांधकाम कामगार, चालक अशा गटातील नागरिकांचे आहे. पालिकेकडून शासनाच्या सुचनांनुसार  हाय रिस्क गटातील लोकांची वारंवार एचआयव्ही तपासणी, रक्त तपासणी केली जाते. यासोबतच त्यांचे समुपदेशनही करण्यात येते. पालिकेकडून दर सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने एड्सविषयक जनजागृतीकरिता समुपदेशकांची नियुक्ती केली जाते. देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. मात्र, या स्त्रियाच अधिक जागरुक असल्याचे आणि असुरक्षित लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यापासून परावृत्त झाल्याचे पालिकेच्या पाहणीमधून समोर आले आहे. तपासणी केल्यानंतर जर रोगनिदान झालेच तर तातडीने उपचार सुरु केले जातात. रुग्णांची नियमित तपासणी केली जाते. उपचारांमध्ये सातत्य राहील याची काळजी घेतली जात असल्याचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले. उपचारांमध्ये सातत्य राहिल्याने सीडीफोर पेशी वाढतात. आजाराची लक्षणे कमी होत जातात. याचा परिणाम आयुर्मयार्दा वाढण्यामध्ये होतो. पुण्यामध्ये १० वर्षांहून अधिक काळ  सातत्यानं उपचार घेऊन सर्वसामान्य जीवन जगणारेही रुग्ण आहेत. ====शासनानं १९८७ मध्ये  ह्यएड्स कंट्रोलह्ण हा कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीसह आजाराची लागण कशी होते, रक्त तपासणी, उपचार याविषयी जनजागृती सुरु करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, रेल्वे आणि बस स्थानके, सार्वजनिक ठिकाणांवर पोस्टर्स, बॅनर्स लावणे, जाहिराती, रेडीओ, टेलीव्हीजन, इंटरनेट आणि अलिकडच्या काळात सोशल मिडीयाचा वापर जनजागृतीसाठी केला जात आहे. ====महापालिकेकडून आजाराचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी हाय रिस्क गटातील व्यक्तींची तपासणी, बाधित व्यक्तींवर नियमित तसेच विनाशुल्क उपचार, त्यांच्या संपकार्तील व्यक्तींची तपासणी, समुपदेश अशा उपाययोजना राबविल्या जात आहेत. गर्भवती स्त्रिया, अतिदक्षता विभागातील रुग्ण, रक्तपेढीमध्ये गोळा होणारे रक्त, शस्त्रक्रियेसाठी आलेले रुग्ण, डॉक्टर्स आणि सहकारी अशा घटकांचीही तपासणी करण्यात येते. ====कशामुळे होऊ शकतो एड्सअसुरक्षित लैंगिक संबंधदूषित रक्त संक्रमणमातेकडून गर्भ किंवा स्तनपान करणाºया बाळालाशिरेतून नशा आणणाºया औषधांचा वापर ====यापूर्वीची एड्सवरील औषधे अत्यंत महाग होती. त्यामुळे ती सर्वसामान्य रुग्णांना परवडत नव्हती. त्यानंतर स्वस्तातली आणि जेनेरीक औषधेही बाजार आली. पालिका आणि राज्य शासनाच्या केंद्रांमध्ये तसेच ससून रुग्णालयात ही औषधे मोफत दिली जातात. विविध स्वरुपाच्या औषधांच्या संचाला एआरटी (अँटी रेट्रो व्हायरल थेरपी) असं म्हणतात. या औषधांच्या नियमित सेवनाने आजार बळावत नाही. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढत जाते, त्यामुळे जंतूंचा प्रभाव कमी होतो. 

टॅग्स :PuneपुणेHIV-AIDSएड्सPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाHealthआरोग्य