पुणे : गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी फळभाज्यांची आवक स्थिर राहिली. मात्र, फळभाज्यांना मागणी कमी असल्याने कांदा, दोडका, प्लॉवर, कोबी, वांगी, कारली, दुधी भोपळा, शिमला मिरची आणि मटारच्या भावात घट झाली. तर इतर सर्व फळभाज्यांचे दर स्थिर होते.
रविवारी बाजारात ७० ते ८० गाड्यांची आवक झाली. परराज्यातुन आलेल्या मालामध्ये राजस्थानातून १० ट्रक गाजर, कर्नाटक, गुजरातमधून ४ ते ५ टेम्पो कोबी, कर्नाटक आणि गुजरातमधून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू मधून ३ ते ४ टेम्पो शेवगा, मध्यप्रदेशातून २५ ट्रक मटार , तर मध्यप्रदेश आणि गुजरात येथून लसणाची १४ ते १५ ट्रक आवक झाली.
स्थानिक आवकेमध्ये सुमारे १२०० गोणी सातारी आले, सुमारे ४ ते ५ टेम्पो कोबी , १० ते १२ टेम्पो फ्लॉवर , ८ ते १० टेम्पो भेंडी ,७ ते ८ टेम्पो गवार, १० ते १२ टेम्पो सिमला मिरची ,६ ते ७ हजार पेटी टोमॅटो , सुमारे ५० ते ६० गोणी भुईमुग शेंगा , ३ ते ४ टेम्पो घेवडा, ८ ते १० टेम्पो तांबडा भोपळा ,२ ते ३ टेम्पो हिरवी मिरची,५ ते ६ टेम्पो पावटा एवढी आवक झाली. त्याचप्रमाणे कांद्यामध्ये जुना कांदा १२५ ट्रक आणि नवीन कांद्याची २५ ट्रक इतकी आवक झाली.