पुणे : गणेशोत्सवात दर वर्षी वाढत्या उत्साहात ध्वनिप्रदूषणातही वाढ होत असल्याचे दिसून येत होते. मात्र, यंदाच्या वर्षी त्यामध्ये लक्षणीय घट झाली आहे.कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणेच्या (सीओईपी) प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी केलेल्या पाहणीत यंदा लक्ष्मी रस्त्यवरील सर्व चौकांतील सर्व वेळांचे ध्वनिप्रदूषण सरासरी ९०.९ डेसिबलपर्यंत खाली आले आहे.प्रा. डॉ. महेश शिंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुरली कुंभारकर, नीलेश वाणी, अतुल इंगळे, सतीश सुखबोटलावर, सुदेश राठोर, गणेश ठोमरे, तुषार राठोड, कृष्ण मोडक, नागेश पवार, राजेश सज्जन,श्रीकांत चांभारे, अमोल राऊत, आकाश राठोड या विद्यार्थ्यांनी शहरातील विविध चौकांत ध्वनिप्रदूषणाची पाहणी केली. त्यात कार्यकर्ते आणि भाविक यांच्यात ध्वनिप्रदूषणाबाबत जागृती वाढल्याचे निदर्शनास आले.स्थिर वादनासाठीचे क्षेत्र ठराविक चौकांपुरते मर्यादित ठेवण्यात पोलिसांना बºयाच प्रमाणात यश आले. गेल्या वर्षी आवाजाची पातळी ९२.६ डेसिबल एवढी होती. मानाच्या गणेश मंडळांबरोबरच दिवसाभरातील मंडळांत पारंपरिक वाद्यांच्या वादनाचे प्रमाण वाढले. मंडळांकडूनही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आले.
पुणे: विसर्जन मिरवणुकीत यंदा ध्वनिप्रदूषणाच्या पातळीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 1:15 AM