राजेगाव : राजेगाव (ता. दौंड) परिसरातील पाण्याच कमतरतेमुळे उन्हाळी भुईमुगाच्या लागवडीत घट होण्याची शक्यता या वर्षी निर्माण झाली आहे. य ावर्षी कमी झालेल्या पावसामुळे फेब्रुवारी महिन्यातच विहिरी, कूपनलिका असे जलस्रोत आटू लागले आहेत. उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्येही अतिशय कमी पाणी आहे. त्यामुळे तीच पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालू आहे. परिणामत: नवीन उन्हाळी भुईमूग लागवडी कमी होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे या परिसरात दर वर्षी भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांत बागायत क्षेत्रात उन्हाळी भुईमुगाची लागवड केली जाते. भुईमुगाचे पीक कमी पाण्यातही तग धरत असल्यामुळे भुईमुगावर भर असतो. काही शेतकरी उत्पन्नासाठी भुईमुगाचे पीक घेतात, तर काही शेतकरी वर्षभर खाण्यासाठी पुरेल एवढ तरी किमान भुईमूग पिकाची लागवड करीत आलेले आहेत. (वार्ताहर)
उन्हाळी भुईमुगाच्या लागवडीत घट
By admin | Published: February 19, 2016 1:27 AM