शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार
3
विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची निर्यात, हे पाच नेते महायुतीतील मित्रपक्षांकडून लढणार
4
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
5
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे
6
"लॉरेंस बिश्नोई खरा गांधीवादी, तो तर...", सलमान खानचा उल्लेख करत काय म्हणाल्या साध्वी प्राची?
7
इस्रायलच्या 'या' एका चुकीवर इराण 1000 क्षेपणास्त्र डागणार, 'खतरनाक' प्लॅन उघड
8
Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास
9
Gold Silver Rates : धनत्रयोदशीपूर्वी स्वस्त झालं सोनं; एका वर्षात ३० टक्क्यांनी वाढलाय भाव
10
"माझी लढाई त्यापेक्षा मोठी...", आदित्य ठाकरेंसोबतच्या तुलनेवर अमित ठाकरे थेट बोलले!
11
Diwali: दिवाळीनिमित्त घराला रंग देताय? येणारे-जाणारे, पै-पाहुणे पाहतच राहतील असे कलर कॉम्बिनेशन...
12
Diwali 2024: दिवाळीत चुकूनही भेट म्हणून देऊ नका 'या' सहा वस्तू; नात्यात येईल वितुष्ट!
13
अरे देवा! मजुरी करून बायकोला शिकवलं, नोकरी लागल्यावर तिने नवऱ्यालाच सोडलं, म्हणाली...
14
Diwali 2024: आंघोळ आपण रोजच करतो, तरी दिवाळीत अभ्यंगस्नानाला एवढे महत्त्व का? वाचा!
15
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
16
इच्छुकांसोबत चर्चेदरम्यान मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू; २५ तास चालल्या मुलाखती
17
Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
18
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
19
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
20
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?

शेवगा, गवार, मटारच्या भावात घट

By admin | Published: November 23, 2015 12:49 AM

आवक वाढल्याने मागील आठवड्यात तेजीत असलेल्या फळभाज्यांचे भाव रविवारी काही प्रमाणात कमी झाले. पालेभाज्यांची आवकही माफक होत

पुणे : आवक वाढल्याने मागील आठवड्यात तेजीत असलेल्या फळभाज्यांचे भाव रविवारी काही प्रमाणात कमी झाले. पालेभाज्यांची आवकही माफक होत असल्याने भाव स्थिर राहिले. मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोचे भाव काहीसे उतरले असले तरी तेजीत आहेत.गुलटेकडी येथील मार्केटयार्डात रविवारी १७० ते १८० ट्रक शेतमालाची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक वाढल्याने बहुतेक भाज्यांचे भाव उतरले आहेत. गवार व पावट्याच्या भावात प्रति दहा किलोमागे प्रत्येकी २०० रुपयांची घट झाली. मटारच्या भावही मागील आठवड्याच्या तुलनेत निम्म्याने उतरले आहेत. ढोबळी मिरची, घेवडा व शेवग्याच्या भावात १०० ते १५० रुपयांची तर दोडका, काकडी, गाजर, तोंडलीचे भाव ५० रुपयांनी उतरले. लसुण व भुईमुग शेंगच्या भावात प्रत्येकी २०० रुपयांची वाढ झाली. हिरवी मिरची व कारल्याच्या भाव प्रत्येकी ५० रुपयांनी वाढले. कोथिंबीरची आवक वाढल्याने भावात मागील आठवड्याच्या तुलनेत शेकडा जुडीमागे ३०० रूपयांची घट झाली. रविवारी बाजारात सुमारे अडीच लाख जुडी कोथिंबीरची आवक झाली. तर मेथीची सुमारे दीड लाख जुडी आवक झाली. मेथीसह इतर भाज्यांचे भाव स्थिर राहिले.रविवारी घाऊक बाजारात परराज्यातून राजस्थान व पंजाब येथून ६ ते ७ ट्रक मटार, राजस्थानातून ५ ते ६ ट्रक गाजर, कर्नाटक येतून ४ ते ५ ट्रक कोबी, कर्नाटक व मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथून ४ ते ५ ट्रक शेवगा, मध्य प्रदेशातून सुमारे ३ हजार गोणी लसणाची आवक झाली. तर स्थानिक भागासह इंदौर व आग्रा येथून ४० ते ४५ ट्रक बटाट्याची आवक झाली.स्थानिक भागातून सातारी आले ५५० ते ६०० गोणी, टोमॅटो ३.५ ते ५ हजार पेटी, फ्लॉवर १८ ते २० टेम्पो, कोबी १५ ते १६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, शेवगा २ टेम्पो, मटार २ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, पावटा ५ ते ६ टेम्पो आणि रताळी ८ ते १० टेम्पो आवक झाली. फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : जुना ४५०-५००, नवा : ४५०-२५०, बटाटा : ८०-११०, लसूण ९००- १४००, आले : सातारी ३५०, बंगलोर ३००, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान व सुरती ३००-४००, टोमॅटो : ३०० -३५०, दोडका : २००-३००, हिरवी मिरची : १६०-२२०, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी २००-२५०, काकडी : १००-१५०, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी १८०- २००, पापडी : २००-२५०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : १००-१४०, कोबी : ६०-१२०, वांगी : १००-१५०, ढोबळी मिरची : १४०-१६०, तोंडली : कळी २००-२२०, जाड १००, शेवगा : ५००-६००, गाजर : २००-२५०, वालवर : २००-२५०, बीट : १२० - १५०, घेवडा : ४००, कोहळा : १००-१५०, आर्वी २००-२५०, घोसावळे : १६० -१८०, ढेमसे : २०० -३००, भुईमुग शेंग : ५००-६००, मटार : स्थानिक व परराज्य ६००-७००, पावटा : ३५०-४००, तांबडा भोपळा : ६०-१००, रताळी १००-१२०, सुरण : २५०-२६०, नारळ : १०००-१२००, मका कणीस (शेकडा) : २००-३००.