बारामती : योग्य नियोजन व सतर्कता यामुळे बारामती तालुक्यातील क्षयरोग रूग्णांचे रोगमुक्त होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त राहिले आहे. आरोग्यविभागाच्या पाठपुराव्यामुळे क्षयरोग रूग्णांच्या उपचारामध्ये सातत्य राहतआहे. त्यामुळे क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागानेडॉट्स (डायरेक्टली आॅब्जर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स) उपचार पद्धतीसुरू केल्यानंतर क्षयरूग्णांच्या मृत्युदरात घसरण झाली. त्यामुळे ‘डॉट्स’उपचारपद्धती क्षयरुग्णांसाठी लाभदायी ठरत आहेत.बारामती तालुका क्षयरोग मुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक मागील काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील आहे. या पथकामध्ये तालुका आरोग्य अधिकारी, औषधोपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा पर्यवेक्षक, प्रयोगशाळातंत्रज्ञ यांचा समावेश करण्यात आला आहे. या पथकांच्या माध्यमातूनक्षयरुग्ण शोधण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येते. यासाठी आशास्वयंसेविकांची देखील मोठी मदत आरोग्य विभागाला होत आहे. सर्व्हेक्षणानंतर प्राथमिक टप्प्यात निदान होऊन तातडीने उपचार सुरू करण्यात येतात. रुग्णांना Þडॉट्स उपचार पद्धती सुरू करण्यात येते.क्षयरोग रूग्णांनी वैद्यकिय निदेर्शाप्रमाणे सहा महिन्यांपर्यंतडॉक्टरांच्या सल्ल्याने उपचारांमध्ये सातत्य ठेवले पाहिजे. मात्र काहीरूग्ण तात्पुरत्या उपचारांनी बरे वाटले की, लगेच औषधे घेणे थांबवतातअसेही निरिक्षण नोंदवण्यात येत आहे. त्यामुळे अशा रूग्णांना क्षयरोगधोकादायक ठरू शकतो. हे रूग्ण दुसºया टप्प्यात म्हणजेच औषधांना दाद नदेणारा क्षयरोग (एमडीआरटीबी) यामध्ये पोहचतात. परिणामी या अवस्थेतूनरूग्णांना बाहेर काढणे कठिण असते. त्यामुळे उपचार पूर्ण झाल्यानंतररुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेऔषध बंद करावे, असा सल्ला वैद्यकियतज्ज्ञ देतात. क्षयरोग्याने विडी, सिगारेट, हुक्का, तंबाखू, दारू याव्यसनांपासून दूर रहावे. नशा असणाऱ्या ही पदाथार्चे सेवन करू नये.या रुग्णांना शासनाच्या वतीने प्रती महिना ५०० रुपये पोषण आहारासाठीदेण्यात येतात. त्यासाठी संबधित क्षयरुग्णांनी बँकेच्या पासबुकचीछायांकित प्रत आरोग्य अधिकाºयांना द्यावी, अशी माहिती तालुका क्षयरोगपर्यवेक्षक एम. एम. मोहिते, एस. के. येळे यांनी दिली.
बारामती तालुक्यातील क्षय रुग्णाचा आढावातपशील - २०१९ २०१८निदान झालेले रुग्ण - ५५० ४००एकूण बरे झालेले - ५२७ ३८६मृत्यू - ११ ०८
(२०२० या वर्षामध्ये मे महिना अखेर १७९ क्षयरोगग्रस्त रूग्ण बारामतीतालुक्यात अढळून आले आहेत. सध्या या रूग्णांवर उपचार सुरू आहेत. या वर्षात अद्याप एकाही क्षयरोग ग्रस्त रूग्णाचा मृत्यू झाला नाही.)
डॉट्स पद्धतीत नेमके काय केले जाते.- राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविणे- सूक्ष्मदशीर्चा वापर करून पल्मनरी लक्षणे तपासून संभाव्य क्षयरोगी शोधणे- क्षयरोगावरील औषधांचा अखंड पुरवठा- सुरुवातीच्या जास्त तीव्रतेच्या काळात उपचारांवर थेट नजर ठेवणे(डायरेक्ट आॅब्झर्वेशन)- क्षयरोगावरील प्रभावी औषधांचा डोस घेणाºया प्रत्येक व्यक्तीचीआरोग्य-कर्मचारी विचारपूस व निरीक्षण करतात- प्रत्येक क्षयरोग रुग्णावर केलेल्या उपचारांच्या मूल्यमापन करण्यात येते----------डॉट्स चे फायदे- क्षयरोगावर खात्रीशीर तसेच चटकन इलाज होतो- ९५ टक्के रोगी बरे होतात- उपचार पद्धतीमुळे क्षयरोग्यांचे आयुष्यच बदलते- रोगाचा कालावधी कमी होतो- मृत्युच्या प्रमाणात घट होते- एचआयव्ही ची लागण झालेल्या क्षयरोग्यांना असलेला धोका कमी होतो- सर्व आरोग्य केंद्रांवर डॉट्स मोफत सुरू आहे------क्षय रोगाची सामान्य लक्षणे- तीन आठवड्यापेक्षा जास्त कफ राहणे,कधीकधी कफावाटे रक्त पडणे- ताप, खासकरुन रात्रीच्या वेळी- वजनात घट- भूक मंदावणे
क्षयरोगावरील औषधे नियमितपणे व सांगितल्याप्रमाणे घेतल्यास हा रोग पूर्णपणे बरा होतो. डॉटस उपचार पद्धती लाभदायक ठरत असल्याचा परिणाम दिसून येत आहे.- एम. एम. मोहितेतालुका औषधोपचार परिवेक्षक
क्षयरोग रूग्णाने उपचार सुरू केल्यानंतर त्यामध्ये वैद्यकियनिदेर्शाप्रमाणे ६ महिन्यांपर्यंत सातत्य ठेवणे गरजेचे आहे. उपचारांमध्येसातत्य राहिल्यास रूग्ण पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे तात्पुरते इलाज करून या रोगाकडे दुर्लक्ष करू नये. - डॉ. सदानंद काळे, वैद्यकीय अधीक्षक,उपजिल्हा रुग्णालय, बारामती-------बारामतीत येथे होतात मोफत क्षयरुग्णावर उपचारप्राथमिक आरोग्य केंद्रे - ०९उपजिल्हा रुग्णालय - ०१ग्रामीण रुग्णालय - ०२प्राथमिक आरोग्य उपकेंद्र - ५२आयसीटीसी केंद्रे - ०३एआरटी केंद्र - ०१महिला रुग्णालय -०१ -------------------