शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

रुग्णसंख्या कमी, पण डेल्टाने वाढवली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:09 AM

पुणे : सरत्या आठवड्यात शहरात ३६,८०८ चाचण्या झाल्या, १७३० रुग्णांची नोंद झाली तर ४० रुग्णांचा मृत्यू झाला. २१ ते ...

पुणे : सरत्या आठवड्यात शहरात ३६,८०८ चाचण्या झाल्या, १७३० रुग्णांची नोंद झाली तर ४० रुग्णांचा मृत्यू झाला. २१ ते २८ जून या कालावधीत पॉझिटिव्हिटी रेट ४.७० टक्के इतका होता. मात्र, दररोजची रुग्णसंख्या २५० ते ३०० च्या दरम्यान असल्याने अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. दुसरी लाट ओसरत असल्याचे वाटत असतानाच डेल्टा प्लसने चिंता वाढवली आहे. त्यामुळे नागरिकांनी गाफील आणि निष्काळजी न राहता कोरोना प्रतिबंधक वर्तन करण्याचे आवाहन केले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून पॉझिटिव्हिटीचा रेटही ५ च्यावर गेला आहे.

२१ ते २७ जून या आठवड्यात सातपैकी तीन दिवस पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या वर गेला होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अनलॉक झाल्यापासून नागरिकांनी बाजारपेठेत, सार्वजनिक ठिकाणी, पर्यटनस्थळी गर्दी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांचे बेजबाबदार वर्तन कायम राहिल्यास पुढील चार ते सहा आठवड्यांत तिसरी लाट येण्याचा धोका आहे.

लसीकरण हा साथ रोखण्याचा एकमेव उपाय आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढल्यास जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनापासून संरक्षण मिळू शकणार आहे. पुणे जिल्ह्यात दोन दिवस एक लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण पार पडले. पुरेशा लसी उपलब्ध झाल्यास आणि हा वेग कायम राहिल्यास तिसऱ्या लाटेचा वेग रोखता येऊ शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

-------

गेल्या आठवड्यातील स्थिती :

दिनांक चाचण्या रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट

२१ जून ३८७२ १३६ ३.५१

२२ जून ४८७८ २२० ४.५१

२३ जून ५४३७ २८३ ५.२०

२४ जून ५६९६ ३३३ ५.८४

२५ जून ५७९५ २५८ ४.४५

२६ जून ५८५९ २२६ ३.८५

२७ जून ५२७१ २७४ ५.१९

-----

महिन्याभरातील स्थिती :

आठवडा चाचण्या रुग्ण मृत्यू

३ मे-९ मे १,१३,०१४ १८,९३३ ४२८

१० - १६ मे ८८,०८४ १२७३९ ३४८

१७-२३ मे ७२, २७४ ६३२२ ३०१

२४-३० मे ५५८५२ ४१२२ २२५

३१ मे-६ जून ४६,७०० २५०७ १६३

७ - १३ जून ३९,८८५ १८५८ ८०

१४-२० जून ३६,१३९ १७४२ ५६

२१-२७ जून ३६,८०८ १७३० ४०

------

पॉझिटिव्हिटी रेट

१६.७५

१४.४६

८.७४

७.३८

५.३६

४.६७

४.८२

४.७०