श्री क्षेत्र नारायणपूर येथील प. पू. नारायण महाराज, आमदार संजय जगताप, गुरुवर्य खंडू (अण्णा) पिसाळ, संत सोपानदेव देवस्थानचे मुख्य विश्वस्त अॅड. त्रिगुण गोसावी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
प्रवेशद्वार, दीपमाळ, कुंडावर संरक्षक जाळी, गणेशमूर्तीला वज्रलेप, चारही बाजूंनी उत्तम दगडी बांधकाम असे सुमारे ३२ लाखांचे काम येथील संत सोपानदेव गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष वामन जगताप यांनी स्वखर्चातून केले आहे. काही वर्षांपूर्वी या कुंडात सोहम खोमणे आणि आदित्य देशमाने या छोट्या मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही तरी करावे याच भावनेतून हे काम केल्याचे वामन जगताप यांनी प्रास्तविकात सांगितले .
सोपानदेव परिसरात इतके उत्तम काम होत आहे हे खरे देवकार्यच असल्याची भावना मुख्य विश्वस्त अॅड. त्रिगुण गोसावी यांनी व्यक्त केली. आमदार संजय जगताप यांनी अत्यंत बारकाईने, सुबक असे हे सुशोभीकरण वामन जगताप यांच्या हातून पार पडले आहे. त्यांच्या या गुणांचा सासवडच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी उपयोग करून घेतला जाईल असे स्पष्ट केले. प. पु. नारायण महाराज यांनी वामन जगताप यांच्या दातृत्वाचे कौतुक करत त्याच्याकडून अशीच सेवा घडत जावो, असा आशीर्वाद दिला.
तुषार ननावरे यांनी सूत्रसंचलन तर नंदकुमार जगताप यांनी आभार मानले. नारायणपूर देवस्थानचे व्यवस्थापक भरत नाना क्षीरसागर, नगरसेवक संजय जगताप, संजय चौरे, बाळासोा पायगुडे, यशवंत जगताप, अरुण जगताप, एम. के. गायकवाड, वीर देवस्थानचे अभिजित धुमाळ, रवी ताकवले, गणेश जगताप यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते. खंडू जगताप, संजय जगताप, कुलदीप निगडे, दिगंबर जगताप, नंदकुमार जगताप, जनार्दन गवळी, हरी कुंभार आदी मंडळींनी संयोजन केले.
फोटो
(१) भागीरथी कुंडाचे लोकार्पण करताना प. पू. नारायण महाराज आमदार संजय जगताप, वामन जगताप व मान्यवर.