याप्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेविका अर्चना मुसळे, नगरसेवक प्रकाश ढोरे, ॲड. मधुकर मुसळे, स्वीकृत नगरसेवक सचिन पाषाणकर, मयूर मुंढे, राजेंद्र मुरकुटे, रोहन कुंभार, सोमनाथ नवले, उमेश घुगे, रवी ओसवाल ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश वझरकर उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक करताना नगरसेविका अर्चना मुसळे यांनी परिसरामध्ये चालू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. औंध भागात शास्त्रोक्त पद्धतीने रस्ते विकसित केल्यावर रस्ते व फुटपाथ सुंदर झाले, परंतु कार पार्कची जागा कमी झाली अशी या भागातील नागरिकांची व व्यापाऱ्यांची तक्रार होती. ही अडचण दूर करण्यासाठी औंधमधील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी परिहार चौकाजवळील जागा वाहनतळ उभारण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ताब्यात घेतली व त्यासाठी निधी उपलब्ध उपलब्ध करून वाहनतळाची निर्मिती करण्यात आली. औंध बाजारपेठेलगत यामुळे चारचाकी व दुचाकी गाड्यांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध झाले आहे.