परशुराम भवनाच्या बांधकामास प्रारंभ झाल्यावर नवीन वास्तू मधील एका सभागृहास गोखले कुल सभागृह असे नाव द्यावे व या करीता सर्व गोखले परिवाराने एकत्र येऊन १५ लाख रुपयांचा निधी संघास देऊन गोखले परिवाराची चिरंतन स्मृती नूतन वास्तू मध्ये जपली जावी, यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय कार्यकारिणीने एक मताने घेतला.
या निर्णया प्रमाणे निधी संकलानास सुरूवात करून १ लाख रुपयांचा धनादेश कुल मंडळाने २०१९ सालामध्ये संघाकडे सुपूर्द केला आहे. मार्च २०२१ पर्यंत मंडळाकडे जमलेला आणखीन ५ लाख रुपयांचा निधी गोखले परिवाराचे ज्येष्ठ सदस्य व मार्गदर्शक (नि) एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते धनादेशाद्वारे संघाच्या कार्यकारिणी कडे सुपूर्द केला आहे.
नियोजित १५ लाखांच्या रकमेमधील ६ लाख रुपयांची रक्कम मंडळाने, चित्पावन संघाकडे आज मितीस दिली आहे. शिल्लक ९ लाख रुपयांची रक्कम लवकरच जमवून संघाकडे देणार आहेत.