या वेळी सरपंच रूपेश ठोंबरे, फुलगावच्या सरपंच मंदानानी साकोरे, तुळापूरच्या सरपंच गुंफा इंगळे, डोंगरगावच्या सरपंच रजनी कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा इनामदार, डॉ. प्रियांका सातव, पंचायत समितीच्या सदस्या संजीवनी कापरे, माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाळके पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, शिवाजी वाळके, रवींद्र वाळके, कंपनीचे व्यवस्थापक बिपीन चिरमोरे, अनंता खंडागळे, अरुण चौधरी, चंद्रकांत शिंदे आदी उपस्थित होते.
स्टफ इंडिया कंपनीच्यावतीने अत्याधुनिक खोलीबरोबर सॅनिटायझर मशीन, फेस मास्क शिल्ड, मास्क, सॅनिटायझर आदी वस्तू आरोग्य केंद्राला देण्यात आल्या. कंपनीच्या सीएसआर निधीतून सदर उपक्रम राबविल्याबद्दल प्रदीप कंद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास उंद्रे आदींनी अभिनंदन केले. या उपक्रमाचे नियोजन स्टफ इंडियाचे अरुण चौधरी, सामाजिक कार्यकर्ते सुनील कवडे यांनी केले.
फोटो ओळी- पेरणे (ता. हवेली) प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी स्टफ इंडिया कंपनीतर्फे अत्याधुनिक खोली लोकार्पण करताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद व इतर मान्यवर.
छाया- के. डी. गव्हाणे