यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील,सरपंच मीरा दहातोंडे, उपसरपंच विक्रम पाचपुते,उद्धव महाराज,माऊली महाराज दौडकर,पोलीस पाटील अमोल पाचपुते,
दिनेश लांडगे, भरत लांडगे, अक्षय पडवळ, रोहित डावरे, काळूराम पिंजण, सुनील देवकर, शिवाजी डावरे, कृष्णराव सांडभोर, किसन पिंजण, पाचपुते, दत्तात्रय लांडगे, दत्तात्रय करंडे, शिवाजी कावरे, वसंत तनपुरे, संदीप बोत्रे, कोंडीबा गडदे, माऊली पडवळ, संपत राऊत, सोमनाथ पाचपुते, चेतन पाचपुते, ऋत्विकराज मांडेकर आदी उपस्थित होते.
भामचंद्र डोंगर पायथ्याशी असलेल्या मारुती मंदिर परिसरात दरवर्षी मोठा अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत असतो. त्यामुळे येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, वासुली ग्रामपंचायत आणि भामचंद्र डोंगर सप्ताह समितीच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना, सभामंडप, पाणपोई व सुलभ सौचालय कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्याचे लोकार्पण आषाढी एकादशीच्या निमित्ताने करण्यात आले.
भामचंद्र डोंगर परिसरास क वर्ग तीर्थक्षेत्र विकास निधीतून आणि लोकसहभागातून पुढील काही दिवसांत येथे संत साहित्याचा अभ्यासिका,अखंड हरीनाम सप्ताहसाठी भव्य सभागृह, स्वपाकगृह आदी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात इतर ठिकाणचे सुलभ सौचालयाचे प्रस्ताव अजूनही मंजूर झाले नाही. परंतु या जिल्हा परिषद गटात सुलभ शौचालय मंजुर करून काम पूर्ण लोकार्पणद झाल्याचे त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन सुनील देवकर यांनी केले तर आभार पोलीस पाटील अमोल पाचपुते यांनी मानले.
--------------------------------------------------------
फोटो क्रमांक : २०आंबेठाण शौचालय लोकार्पण
फोटो ओळ : सुलभ शौचालयाचे लोकार्पण करताना शरद बुट्टे पाटील, सरपंच मीरा दहातोंडे आदी