पुणे : एकपात्री कलाकार परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी अभिनेते दीपक रेगे यांची, तर चैताली माजगावकर- भंडारी यांची उपाध्यक्षपदी आणि नरेंद्र लवाटे यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
ही निवड एका वर्षासाठी आहे. सुरेंद्र गुजराथी व हेमंत चौधरी (सहसचिव), अरुण पटवर्धन (खजिनदार), मंजूषा जोशी (सहखजिनदार), दिलीप हल्याळ (सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख) तसेच मकरंद टिल्लू, अनुपमा कुलकर्णी आणि पल्लवी परब यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. सुरेंद्र माजगावकर, विजय कोटस्थाने आणि राहुल भालेराव यांची कार्यकारिणी सल्लागार म्हणून निवड झाली आहे.
संस्थेचे पंधरावे वर्ष असून, यापुढील काळात प्रत्यक्ष व ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. करोनाकाळात कार्यक्रमांमधून जागृती करण्यात येणार आहे. १ जून हा दिवस मधुकर टिल्लू स्मृतिदिन एकपात्री दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. लहान मुलांसाठी नाट्यवाचन, नाट्यछटा, कथाकथन, कविता वाचन असे कार्यक्रम तसेच स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे रेगे यांनी सांगितले.
-------