पुणे : काहीही करून पत्नीने घटस्फोट द्यावा, यासाठी डॉक्टर पतीने आपल्या डॉक्टर पत्नीची फ्लेक्सबाजीद्वारे बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसर येथील वेगवेगळ्या चौकांमध्ये पतीने पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यात ‘सॉरी’चा उल्लेख करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. घटस्फोट आणि आपल्यावरील केस मागे घेण्यासाठी पत्नीला गळ घालण्यासाठी या फ्लेक्सबाजीचा डॉक्टर पतीने पर्याय शोधला आहे. रस्त्यात अडवून खून करण्याची धमकी देणे, चेहºयावर अॅसिड टाकून चेहरा विद्रूप करण्याची धमकी देणे यावरून डॉक्टरवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टर दाम्पत्याबाबत पुणे कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. पत्नीच्या वतीने अॅड. विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी तक्रारीचा अर्ज दाखल केला आहे. घटस्फोट होईपर्यंत पतीने कुठल्याही प्रकारे पत्नीशी संपर्क साधू नये तसेच तिला धमकावू नये, असा उल्लेख आदेशात केला आहे. याविषयी अधिक माहिती देताना ठोंबरे म्हणाले, की संबंधित डॉक्टर दाम्पत्याच्या लग्नाला चार ते पाच वर्षे झाली असून त्यांना एक मुलगी आहे. या दोघांमध्ये पुढे काही कारणास्तव वाद होऊ लागल्याने त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी ८ लाख रुपयांची तरतूद बँकेत केली होती. मात्र, पतीने ते पैसे मिळावेत, यासाठी पत्नीकडे तगादा सुरू केला. याशिवाय, तिला मारण्याची धमकी देणे, मानसिक व शारीरिक त्रास तो देऊ लागला. हा सगळा प्रकार सहन न झाल्याने पत्नीने न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टर पतीवर शहर विद्रूपीकरण कायद्याद्वारे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ठोंबरे यांनी केली आहे.......४या डॉक्टर दाम्पत्याचा रविवारी (दि. १६) लग्नाचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने हडपसर भागातील अनेक चौकांमध्ये फ्लेक्स लावण्यात आले आहेत. हा नागरिकांच्या चर्चेचा व कुतूहलाचा विषय ठरताना दिसत आहे.
घटस्फोटासाठी डॉक्टर पतीकडून फ्लेक्सबाजी करून पत्नीची बदनामी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 5:27 PM
हडपसर येथील वेगवेगळ्या चौकांमध्ये पतीने पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यात ‘सॉरी’चा उल्लेख
ठळक मुद्दे हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल