दोन ट्विटर खातेधारकांवर गुन्हा
बारामती : राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात ट्विटर खात्याद्वारे बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी दोघा खातेधारकांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. vedashree@vedashree_19 व Raje Harshvardhan Shastri या खातेधारकांविरोधात बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बारामतीचे उपनगराध्यक्ष अभिजित जाधव यांनी पोलिसांत फिर्याद दिली. जाधव हे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे १० वर्षांपासून पदाधिकारी आहेत. २३ रोजी त्यांचे मित्र अजित कदम (रा. जळोची, बारामती) यांनी खा. पवार यांच्याविषयी वेदश्री नावाच्या एका मुलीने बदनामीकारक मजकूर लिहिला असून पवारांच्या छायाचित्रासह तो प्रसिद्ध केला असल्याचे तसेच या ट्विटला राजे हर्षवर्धन नामक खातेधारकाने दिलेल्या प्रतिक्रियेतही पवार यांच्याबद्दल बदनामी केल्याचे जाधव यांच्या निदर्शनास आणून दिले. जाधव यांनी याबाबत खात्री करत बदनामी केल्याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
---------------