शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

थकबाकीदारांची होणार बत्ती गुल, महावितरणची धडक कारवाई, कृषीपंपांचीही वीज कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 1:01 AM

बारामती : वारंवार आवाहन करूनही वीजबिल न भरणाºया थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या धडक कारवाईला बारामती परिमंडलात सुरुवात झाली आहे.

बारामती : वारंवार आवाहन करूनही वीजबिल न भरणा-या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या धडक कारवाईला बारामती परिमंडळात सुरुवात झाली आहे. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे किती रक्कम थकलेली आहे, हे न पाहता नियमांच्या अधीन राहून वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जे कृषिपंपधारक चालू देयक भरणार नाहीत, त्यांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.बारामती परिमंडलात सद्य:स्थितीत घरगुती, वाणिज्यिक, तसेच औद्योगिक वर्गवारीतील ५ लाख ९७ हजार २९९ वीजग्राहकांकडे ८० कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकी आहे. यात ५ लाख ३९ हजार ९५ घरगुती ग्राहकांकडे ५८ कोटी ८५ लाख, वाणिज्यिक ५१ हजार २० ग्राहकांकडे १६ कोटी १४ लाख, तर ७ हजार १८४ औद्योगिक ग्राहकांकडे ५ कोटी ३६ लाख रुपयांची थकबाकी आहे.दिलेल्या मुदतीत वीजबिलांचा भरणा न केल्याने थकबाकीचे प्रमाण वाढत असल्याने या थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. बारामती परिमंडलातील ६ लाख ५८ हजार ९७३ कृषिपंपधारकांकडे वीजबिलांचे ३ हजार ३८३ कोटी ३२ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यांनाही वीजबिल भरण्याची विनंती महावितरणकडून करण्यात येत आहे. याशिवाय सार्वजनिक पाणीपुरवठा वर्गवारीतील ४ हजार १८२ वीजग्राहकांकडे ६६ कोटी ४४ लाखांची थकबाकी आहे.बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यांसह सातारा व सोलापूर जिल्ह्यांत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर थकीत वीजबिलांचा भरणा करणे, संबंधित कार्यालयात पावती दाखवून, रि-कनेक्शन चार्जेस भरून वीजपुरवठा सुरू करून घ्यावा लागत आहे. महावितरणच्या संबंधित कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाºयांसह वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांची विशेष पथके या मोहिमेत सहभागी झालेले आहेत. वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही विजेचा वापरकेल्यास फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबिल भरणा केंद्रांसह वेबसाइट तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे आॅनलाइन सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरित भरणा करावाआणि वीजपुरवठा खंडित करण्याचीकटू कारवाई नाइलाजास्तव करण्यास भागपाडू नये, असे आवाहन महावितरणनेकेले आहे.>कृषीपंप वीज ग्राहकांकडे ३३८३ कोटींची थकबाकीबारामती परिमंडलांतर्गत असलेल्या कृषिपंपधारक वीजग्राहकांची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच असल्याने महावितरण आर्थिक तोट्यात आहे.आता कृषीपंप ग्राहकांच्या वीजबिल थकबाकी वसुलीकडे महावितरणने गांभीयार्ने लक्ष दिले असून एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१७ अखेर आकारण्यात आलेले चालू देयक अर्थात दोन त्रैमासिक देयके कृषिपंपधारकांनी न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे.परिमंडलात एकूण ६ लाख ५८ हजार ९७३ कृषीपंप वीज ग्राहकांकडे ३ हजार ३८३ कोटी ३२ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये बारामती मंडलात १ लाख ६५ हजार ३०४ ग्राहकांकडे ८०५ कोटी २० लाख, सातारा जिल्हातील १ लाख ४९ हजार १६९ ग्राहकांकडे २१६ कोटी ८ लाखांची आणि सोलापूर जिल्हातील ३ लाख ४४ हजार ५०० ग्राहकांकडे २ हजार ३६२ कोटी ४ लाख रुपयांची थकबाकी आहे.ंक पॅसिटर बसवले तरच रोहित्र बदलून मिळणार...कृषिपंप वीजग्राहकांचे रोहित्र जळाल्यास अथवा बंद पडल्यास ते दुरुस्त करण्यापूर्वी संबंधित कृषिपंप वीजग्राहकांनी कृषिपंपावर योग्य क्षमतेचा कपॅसिटर बसवला आहे किंवा नाही याची खातरजमा केल्यानंतरच नवीन रोहित्र देण्यात येईल, असे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांनी सांगितले.