लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्यातर्फे आयोजित एआयटीए एमएसएलटीए चौदा वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात ओरिसाच्या सोहिनी मोहंती, महाराष्ट्राच्या ऐश्वर्या जाधव, कर्नाटकाच्या टी साई जान्हवी, तेलंगणाच्या लक्ष्मी दांडू यांनी, तर मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अर्णव पापरकर या खेळाडूंनी पाच मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात ओरिसाच्या बिगरमानांकित सोहिनी मोहंती हिने दिल्लीच्या दुसऱ्या मानांकित रिया सचदेवाचा सरळ सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. महाराष्ट्राच्या ऐश्वर्या जाधव हिने तेलंगणाच्या पाचव्या मानांकित थानिया गोगुलामंडाचा तीन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. कर्नाटकाच्या टी साई जान्हवी हिने पश्चिम बंगालच्या सोळाव्या मानांकित साईजयानी बॅनर्जीचा तर, दहाव्या मानांकित तेलंगणाच्या लक्ष्मी दांडूने उत्तरप्रदेशच्या आठव्या मानांकित शगुन कुमारीचा एकतर्फी पराभव करून आव्हान कायम राखले. मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अर्णव पापरकर याने हरियाणाच्या आठव्या मानांकित सिद्धांत शर्माचा टायब्रेकमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
चौकट
स्पर्धेचा सविस्तर निकाल : उप-उपांत्यपूर्व (मुख्य ड्रॉ)
मुले :
प्रणव रेथीन आरएस, तामिळनाडू (१) वि.वि. समर्थ सहिता ६-३, ६-४,
वेंकट बटलंकी, तेलंगणा (६) वि.वि. रयान कुथार्थ, केरळ ७-५, ४-६, ६-४,
तेजस आहुजा, हरियाणा (३) वि.वि. रजनी रूरिक, कर्नाटक ६-२, ६-१,
सेंजम अश्वजित, मणिपूर (७) वि.वि. अर्णव बिशोई ६-०, ६-१,
महालिंगम खांदवेल, तामिळनाडू (५) वि.वि. आर्या कळंबेला, कर्नाटक, ६-४, ६-४,
अर्णव पापरकर, महाराष्ट्र वि.वि. सिद्धांत शर्मा, हरियाणा, (८) ३-६, ७-६ (२), ६-३,
श्री प्रणव तम्मा, तेलंगणा वि.वि. शौर्य समाला, तेलंगणा ७-६(३), ६-१,
क्रिश त्यागी, कर्नाटक (२) वि.वि. हितेश शर्मा, पंजाब ५-७, ७-५, ७-५,
मुली :
आस्मि आडकर वि.वि. माहिका खन्ना, उत्तरप्रदेश ६-३, ६-१,
ऐश्वर्या जाधव, वि.वि. थानिया गोगुलामंडा, तेलंगणा (५) ६-२, ३-६, ६-२,
टी साई जान्हवी, कर्नाटक वि.वि. साईजयानी बॅनर्जी, पश्चिम बंगाल (16) 6-3, 6-2,
लक्ष्मी दांडू, तेलंगणा (१०) वि.वि. शगुन कुमारी, उत्तरप्रदेश (८) ६-१, ६-१,
संजना देवीनेनी, कर्नाटक (७) वि.वि. वाण्या श्रीवास्तव, कर्नाटक ६-४, ६-२,
सौमित्रा वर्मा, उत्तराखंड वि.वि. अहाण ६-०, ७-५,
कनूमुरी इकराजू, तेलंगणा (६) वि.वि. श्री तन्वी दसारी, कर्नाटक ६-०, ७-५,
सोहिनी मोहंती, ओरिसा, वि.वि. रिया सचदेवा, दिल्ली (२) ६-३, ६-२,