पिंपरी : घरातून बाहेर पडणारा कोणाचे वडील, कोणाचा पती, कोणाचा मुलगा, तर कोणाची तरी आई अथवा बहीण असते. घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा आपली व्यक्ती सुरक्षित घरी परतावी, असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र, रस्तेबांधणीतील काही दोषांमुळे छोटे-मोठे अपघात ठिकठिकाणी घडतात. यातून कुटुंबाची अपरिमित हानी होते. पण याची झळ स्वत:ला पोहोचत नसल्याने रस्तेबांधणीत चुका ठेवणारे निर्धास्त असतात. रस्त्याने जाताना एखादा खड्डा अथवा वर आलेला चेंबर दिसतो. काही ठिकाणी रस्त्याची रचना वर-खाली झालेली असते. मात्र या छोट्या गोष्टी अपघातास निमंत्रण देणाऱ्या ठरतात. कुटुंबातील व्यक्ती जखमी असली अथवा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यास सर्वांचीच पळापळ होते. किरकोळ जखमी असले, तरी उपचाराचा खर्च परवडत नाही. उपचारास किती खर्च येईल, याबाबत शाश्वती नसते. कधी कधी तर वारेमाप पैसा खर्च केला जातो. महापालिकेकडून रस्तेबांधणी, ड्रेनेज आदी कामे करताना ते काम उत्कृष्ट आणि टिकाऊ होणे अपेक्षित असते. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जाते. कामाच्या दर्जाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. एकदा काम झाले की, पुन्हा त्याकडे लक्ष दिले जात नाही. एखादी घटना घडल्यानंतर तेवढ्यापुरती डागडुजी केली जाते. त्यानंतर ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी स्थिती पाहायला मिळते. अनेकजण कुटुंबीयांसह दुचाकीवरून जात असतात; काही वेळा वृद्ध व्यक्ती दुचाकीवर असते. दरम्यान, खड्डा अथवा चुकीचा चेंबर यांचा अंदाज न आल्यास अपघात होऊन मोठे नुकसान होते. अशा वेळी तातडीने सुधारणा करणे गरजेचे असताना तत्परता दाखविली जात नाही. एखादा अपघात घडल्यानंतरच त्या ठिकाणाबाबत चर्चा होते. दुचाकी घसरून मृत्यू, खड्ड्यात पडल्याने डोक्याला मार, अंधारात अंदाज न आल्याने अपघात अशा घटना नेहमीच ऐकत असतो. मात्र, या घटना महापालिकेच्या छोट्या चुकीमुळे घडत असल्याचे समोर येते. या चुकांमुळे अनेकांचे बळी जातात. (प्रतिनिधी)दोष प्रशासनाचा; शिक्षा नागरिकांनापिंपरी : घरातून बाहेर पडणारा कोणाचे वडील, कोणाचा पती, कोणाचा मुलगा, तर कोणाची तरी आई अथवा बहीण असते. घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा आपली व्यक्ती सुरक्षित घरी परतावी, असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र, रस्तेबांधणीतील काही दोषांमुळे छोटे-मोठे अपघात ठिकठिकाणी घडतात. यातून कुटुंबाची अपरिमित हानी होते. पण याची झळ स्वत:ला पोहोचत नसल्याने रस्तेबांधणीत चुका ठेवणारे निर्धास्त असतात. रस्त्याने जाताना एखादा खड्डा अथवा वर आलेला चेंबर दिसतो. काही ठिकाणी रस्त्याची रचना वर-खाली झालेली असते. मात्र या छोट्या गोष्टी अपघातास निमंत्रण देणाऱ्या ठरतात. कुटुंबातील व्यक्ती जखमी असली अथवा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यास सर्वांचीच पळापळ होते. किरकोळ जखमी असले, तरी उपचाराचा खर्च परवडत नाही. उपचारास किती खर्च येईल, याबाबत शाश्वती नसते. कधी कधी तर वारेमाप पैसा खर्च केला जातो. महापालिकेकडून रस्तेबांधणी, ड्रेनेज आदी कामे करताना ते काम उत्कृष्ट आणि टिकाऊ होणे अपेक्षित असते. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जाते. कामाच्या दर्जाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. एकदा काम झाले की, पुन्हा त्याकडे लक्ष दिले जात नाही. एखादी घटना घडल्यानंतर तेवढ्यापुरती डागडुजी केली जाते. त्यानंतर ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी स्थिती पाहायला मिळते. अनेकजण कुटुंबीयांसह दुचाकीवरून जात असतात; काही वेळा वृद्ध व्यक्ती दुचाकीवर असते. दरम्यान, खड्डा अथवा चुकीचा चेंबर यांचा अंदाज न आल्यास अपघात होऊन मोठे नुकसान होते. अशा वेळी तातडीने सुधारणा करणे गरजेचे असताना तत्परता दाखविली जात नाही. एखादा अपघात घडल्यानंतरच त्या ठिकाणाबाबत चर्चा होते. दुचाकी घसरून मृत्यू, खड्ड्यात पडल्याने डोक्याला मार, अंधारात अंदाज न आल्याने अपघात अशा घटना नेहमीच ऐकत असतो. मात्र, या घटना महापालिकेच्या छोट्या चुकीमुळे घडत असल्याचे समोर येते. या चुकांमुळे अनेकांचे बळी जातात. (प्रतिनिधी)
1) चिंचवड स्टेशनकडून पिंपरीकडे येणाऱ्या मार्गावर हनुमान मंदिरापासून जवळच एका चेंबरचे लोखंडी झाकण वर आले आहे. याचा दुचाकीचालकांना लवकर अंदाज येत नाही. चेंबरच्या झाकणाच्या टोकावरून दुचाकी घसरल्याने चालकाचे नियंत्रण सुटते. 2) मोरवाडी चौकाकडून न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काही भागाची रचना बदलली आहे. रस्ता वर-खाली झाल्याने चालक गोंधळतात. दुचाकीच्या टायरची रुंदी कमी असल्याने दुचाकी घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेकडून वेळोवेळी रस्ते देखभाल दुरुस्तीची कामे सुरू असतात. यासह कनिष्ठ अभियंत्यांकडून रस्त्यांची पाहणी केली जाते. रस्त्यापासून वर आलेल्या चेंबरचीही दुरुस्ती केली जाते. मात्र, वेगवेगळ्या कारणांनी वारंवार होणाऱ्या रस्ते खोदाईमुळे रस्त्यांची रचना बदलते. - शिरीष पोरेडी, प्रवक्ता, स्थापत्य विभाग