शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

गणेश विसर्जनासाठी जागा निश्चित

By admin | Published: September 26, 2015 1:44 AM

महापालिकेच्या विसर्जन हौदांमध्ये विसर्जित करण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती पूर्णपणे विसर्जित करण्यासाठी विशेष उपाय योजना करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित

पुणे : महापालिकेच्या विसर्जन हौदांमध्ये विसर्जित करण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती पूर्णपणे विसर्जित करण्यासाठी विशेष उपाय योजना करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. यासंदर्भात शुक्रवारी झालेल्या बैठकीत मूर्ती विसर्जनासाठी जागा आणि नियोजन निश्चित करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने दिली आहे. मूर्ती विसर्जनाबाबत निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, तसेच पोलीस आयुक्तांनी एकत्र येऊन दोन दिवसांच्या आत नियोजन करावे, अशा सूचनाही न्यायालयाने केल्या आहेत. शहरात दर वर्षी नदी, तलावात गणेश विसर्जन केले जाते; मात्र यानंतर होणाऱ्या जलप्रदूषणाचा विचार केला जात नाही. त्यातच दुष्काळी परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना विसर्जनासाठी खडकवासला धरणातून नदीत पाणी सोडले जाऊ नये, या संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दखल घ्यावी आणि पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्रक्रियांवर बंदी आणावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. अ‍ॅड. शिवानी कुलकर्णी, सारंग यादवडकर यांनी अ‍ॅड. असिम सरोदे आणि अ‍ॅड. मृणालिनी शिंदे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पाणी सोडण्याबाबत काही निर्णय दिलेला नसला, तरी महापालिकेकडून विसर्जन हौद कशा प्रकारे केले जातात, त्यात विसर्जित केलेल्या मूर्तींचे पुढे काय केले जाते, हौदामध्ये जमा झालेल्या पाण्याचे काय केले जाते, याची माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेकडून विसर्जन हौदांमध्ये संकलित करण्यात आलेल्या मूर्तीचे योग्य पद्धतीने पूर्ण विसर्जन करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन विशेष उपाय योजना करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत. (प्रतिनिधी)