शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

सोहळ्यासाठी देहू, आळंदी सज्ज

By admin | Published: July 08, 2015 1:42 AM

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३०व्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून दिंड्या देहूनगरीत दाखल झाल्या आहेत.

देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३०व्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून दिंड्या देहूनगरीत दाखल झाल्या आहेत. सोहळ्यासाठी ही नगरी सज्ज झाली आहे. बुधवारी अडीचला पालखीचे प्रस्थान होणार आहे. सोहळ्यासाठी मानाचे अश्वदेखील देहूत येऊन दाखल झाले आहेत. देहूनगरीतील वातावरण टाळ-मृदंगाच्या गजराने आणि वीणेच्या झंकारासह हरिनामाच्या जयघोषाचा गजर करीत मुक्कामी विसावले आहेत. सालाबादप्रमाणे प्रत्येक दिंड्यांचे मुक्काम नियोजित जागी पडले असून, तेथे हरिनामसंकीर्तनात दंग झाले असल्याने देहूनगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास पालखीच्या पुढे चालणारे अकलूजच्या मोहिते-पाटील व बाभूळगावकर यांचे अश्व देहूनगरीत दाखल झाले असून, या अश्वांच्या दर्शनासाठी भाविकांनीदेखील गर्दी केली होती. पालखी प्रस्थानपूर्व एक दिवस व अधिक मास यानिमित्त स्थानिक नागरिकांसह राज्यातील भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. मुख्य मंदिरात दर्शनासाठी काकडारती झाल्यापासून भाविकांनी दर्शनबारीतून रांगा लावल्या होत्या. या रांगा दुपारपर्यंत वाढत जाऊन पालखी मार्गावरील बाजारआळीपर्यंत पोहोचल्या होत्या. दुपारनंतर या रांगा अधिकच वाढल्याने दर्शनासाठी अधिकच गर्दी झाली होती. (वार्ताहर)