पुणे : महापालिकेच्या प्रस्तावित शिवसृष्टीसाठी मुस्लिस समाज संघाच्या वतीने महापालिकेसमोर मंगळवारी आंदोलन करण्यात आले. शिवसृष्टीला विलंब होत असल्याबद्दल सत्ताधाऱ्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. मेट्रोचे वनाज स्थानक व शिवसृष्टी एकाच जागेवर आल्यामुळे त्यात वाद निर्माण झाला आहे. माजी उपमहापौर नगरसेवक दीपक मानकर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. एकाच जागेवर दोन्ही प्रकल्प व्हावेत अशी त्यांची मागणी आहे, तर या जागेच्या पुढे असलेल्या बीडीपीच्या जागेवर शिवसृष्टी व्हावी असाही एक प्रवाह आहे.दरम्यान यासंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यंनी मेट्रोचे अधिकारी व मनपा पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. त्यात अधिकारी जागेची पाहणी करून अहवाल सादर करतील व मधल्या काळात मुख्यमंत्री याविषयी बैठक घेतील, असे ठरले. ही बैठक तीन महिने झाले तरी झालीच नाही. त्याचाही निषेध आजच्या आंदोलनात करण्यात आला. नगरसेवक अॅड. गफूर पठाण व मुस्लिम संघाचे इब्राहिम आणि अन्य सदस्यांनी महापालिका सभागृहासमोर घोषणा देत आंदोलन केले. माजी नगरसेवक दत्ता सागरे हेही यात सहभागी होते. महापालिका प्रवेशद्वाराजवळही गाडी लावून त्याचेच व्यासपीठ करून सभा घेण्यात आली. तिथेही सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात आला. विविध संस्था संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत शिवसृष्टी व्हावी अशी मागणी केली.
शिवसृष्टीला विलंब; मुस्लिम समाज संघाचे पुणे महापालिकेसमोर आंदोलन, सत्ताधाऱ्यांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 4:01 PM
महापालिकेच्या प्रस्तावित शिवसृष्टीसाठी मुस्लिस समाज संघाच्या वतीने महापालिकेसमोर मंगळवारी आंदोलन करण्यात आले. शिवसृष्टीला विलंब होत असल्याबद्दल सत्ताधाऱ्यांचा यावेळी निषेध करण्यात आला.
ठळक मुद्देमेट्रोचे वनाज स्थानक व शिवसृष्टी एकाच जागेवर आल्यामुळे निर्माण झाला वाद विविध संस्था संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत शिवसृष्टी व्हावी अशी केली मागणी