आळंदी : अलंकापुरीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शहरात अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यात आला होता. काही मोजक्याच ठिकाणी ही कारवाई झाली होती. अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी रस्त्याची कामे सुरू होती. यामुळे वाहतूककोंडी कायम होत होती. याबाबत ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत अतिक्रमण हटावचे फक्त ‘नाटक’ केल्याचे समोर आले होते. याचे वृत्त येताच आधी शहरातील ९ मीटर रस्तारुंदीकरणात अडथळा असणारे अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना नगर परिषद बांधकाम अभियंता संघपाल गायकवाड यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार दिल्या आहेत. त्यानंतरच रस्त्याचे काम करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहे.आळंदीतील रस्ते अरुंद असल्याने मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती. यातून मार्ग काढण्यासाठी आळंदीतील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, ही कारवाई अपूर्णच राहिली होती. असे असतानाही मोकळ्या जागेत रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. ‘लोकमत’चे वृत्त येताच आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी समीर भूमकर, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, अभियंता संघपाल गायकवाड, नगरसेवक प्रशांत कुºहाडे, शकूर हकीम आदींनी पाहणी केली. यावेळी लोकभावनांचा आदर करून प्रशासनाने लोकहिताचा विचार करून ९ मीटर रस्तारुंदीकरणाने बाधित नागरिकांनी या पूर्वीच्या रुंदीकरणाने संपादित रस्त्याच्या जागेवरील अतिक्रमणे तत्काळ हटवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. नगर परिषदेने कारवाई केल्यास यासाठीचा होणार खर्च मालमत्ताधारकांकडून वसूल केला जाणार असल्याचे प्रशासनाने यावेळी सांगितले.मंदिर परिसराकडे जाणाºया रस्त्यांचे यापूर्वी भूसंपादन करण्यात आले आहे. या रस्त्यांचे ९ मीटर रुंदीप्रमाणे भूसंपादन करून संबंधितांना मोबदलाही देऊन झाला आहे. निर्धारित रुंदीकरणाप्रमाणे जागा ताब्यात घेण्यात येणार आहे. आणखी जागा मोकळी करून घेतल्यानंतरच सिमेंटीकरणाचे काम सुरु करण्यात येईल. तोपर्यंत सुरू करण्यात आलेले काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे बांधकाम अभियंता संघपाल गायकवाड यांनी सांगितले. या पाहणीत रस्त्याच्या रुंदीकरणाप्रमाणे जागा उपलब्ध होत नसल्याची बाब उघड झाली. रस्त्यांचे भूसंपादनाप्रमाणे मोबदला देण्यात आला. मात्र जागा मूळ मालकांनी रिकाम्या करून न दिल्याने रस्त्याचे जागेवर अतिक्रमण कायम असल्याचे आळंदी नगरपरिषद प्रशासनाचे लक्षात आले.यामुळे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी रस्त्यावरील नागरिकांनी स्व:त होऊन अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन केले आहे. तीर्थक्षेत्र आळंदीत विविध विकासकामे सुरू असल्याने नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करून अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे सांगितले.रस्ते विकासाला आळंदीत गती देण्यात आली आहे. आळंदी शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी हाती घेतलेल्या कामास साथ देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.>पिण्याच्या टाक्यांच्या कामाची आळंदीत पाहणीआळंदीत चार ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे काम करण्यात आले आहे. या कामाचीदेखील पाहणी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी केली. यावेळी पाणीपुरवठा व विद्युत विभागाचे प्रमुख दत्तात्रय सोनटक्के उपस्थित होते. ंशहरात सर्वत्र पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठ्यासाठी उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करून घेण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. दत्त मंदिर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. उच्च दाबाने पाणीपुरवठ्यासाठी पाण्याचे वितरण नलिकांचे काम पूर्ण करून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होईल, असे नियोजन हाती घेण्यास सुचविण्यात आले.शासनाने आळंदीच्या विकासास मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून विकासकामे सुरु आहेत. वेळेची मर्यादा असल्याने सर्वांनी सहकार्य करून विकासकामाला साथ द्यावी. नगरसेवक पदाधिकाºयांची अतिक्रमणे असल्यास तत्काळ हटविण्यास त्यांनी सांगितले. विकासाच्या कामात गुणवत्तेत तडजोड सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दर्जेदार विकासकामे करण्यास यंत्रणांनी प्राधान्य देण्याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. - वैजयंता उमरगेकर, नगराध्यक्षा
आधी अतिक्रमणे हटवा; मगच कामे सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 1:55 AM