पुणे : जागतिक पातळीवर झालेल्या सर्वेक्षणामध्ये प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळत असलेल्या पहिल्या शंभर विमान मार्गांमध्ये पुणे ते दिल्ली मार्गाचा समावेश झाला आहे. सर्वाधिक वेगाने प्रवासी संख्या वाढ होत असलेल्या मार्गाच्या यादीत हा मार्ग जगात चौथ्या स्थानावर तर भारतात पहिल्या स्थानावर आला आहे. पहिल्या शंभर मार्गांमध्ये भारतातील देशांतर्गत नऊ व आंतरराष्ट्रीय एकुण दहा मार्गांचा समावेश झाला आहे.जगातील विविध विमानतळांवरून होणारे विमानांचे उड्डाण तसेच प्रवासी संख्येनुसार एका खासगी संस्थेकडून ही पाहणी करण्यात आली आहे. त्यासाठी २०१७ मधील आकडेवारी गृहित धरण्यात आली आहे. त्यानुसार जगात जेजु ते सिओल गिम्पो हा दक्षिण कोरियातील विमान मार्ग सर्वाधिक पसंतीचा ठरला आहे. पहिल्या शंभर विमान मार्गांच्या यादीमध्ये भारतातील दिल्ली ते मुंबई हा मार्ग पाचव्या स्थानावर तर भारतात पहिल्या स्थानावर आहे. या मार्गावर वर्षभरात सुमारे ७० लाख लोकांनी विमान प्रवास केला. या यादीत पुणे-दिल्ली मार्गासह एकुण दहा मार्गांचा समावेश आहे. त्यामध्ये मुंबई-दुबई हा एकमेव आंतरराष्ट्रीय मार्ग आहे. सर्वाधिक वेगाने प्रवासी संख्या वाढत असलेल्या जगातील पहिल्या दहा विमान मार्गांमध्ये पुणे-दिल्ली मागार्चा समावेश झाला आहे. त्यामुळे हा मार्ग देशातील सर्वाधिक वेगाने प्रवासी संख्या वाढणारा मार्ग ठरला आहे. या मार्गावर २०१७ या वर्षात सुमारे २६ लाख लोकांनी प्रवास केला. तर प्रवासी वाढीचा वेग २०.६ टक्के एवढा राहिला आहे. या मागार्पाठोपाठ देशातील मुंबई-दिल्ली मार्गावरील प्रवाशांची संख्या ७.१२ टक्के वाढली. यावरून पुणे-दिल्लीदरम्यान प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा वेग स्पष्टपणे अधोरेखित होतो. जागतिक पातळीवर हा मार्ग ७२ व्या क्रमांकावर असून देशात पाचव्या स्थानावर आहे. देशातील बहुतेक मार्ग दिल्ली व मुंबई विमानतळावरून जाणारे आहेत. मागील काही वर्षांपासून पुणे विमानतळावरून ठिकठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात प्रवासी संख्या १ कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. प्रवाशांसाठी निर्माण केल्या जात असलेल्या सुविधा, नवीन मार्ग तसेच पुणे शहराचे दिवसेंदिवस वाढत जाणारे महत्व यामुळे विमान प्रवाशांमध्ये वेगाने वाढ होत आहे. पुणे-दिल्लीसह पुणे-बेंगलुरू, कोलाकाता, चेन्नई यांसह अन्य काही मार्गांनाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ---------------
पुणे-दिल्ली विमान प्रवाशांमध्ये वेगाने वाढ : जागतिक पातळीवर दहा मार्ग पहिल्या शंभरातपुणे ते दिल्ली मार्गावर दररोज दोन्ही बाजुने एकुण ६० विमानांचे उड्डाण होते. दिल्लीला जाणाºया प्रवाशांची संख्या वेगाने वाढत आहे. कमी तिकीट दर, प्रवाशांच्या वेळेनुसार विमानसेवा उपलब्ध असल्याने पसंती मिळत आहे. तसेच पुणे-बंगळुरू मार्गावरील प्रवासीही वेगाने वाढत आहेत. २०१८ या वर्षाच्या पाहणीत हा मार्गही पहिल्या शंभरात स्थान मिळविले, अशी अपेक्षा आहे. चेन्नई, कोलकाता मार्गही प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे. - अजय कुमार, संचालक, पुणे विमानतळ--------------भारतातील टॉप टेन विमान मार्ग (कंसात जागतिक क्रमवारीतील क्रमांक)-१. मुंबई ते दिल्ली (५) २. बेंगळुरू ते दिल्ली (२४)३. बेंगळुरू ते मुंबई (३३)४. कोलकाता ते दिल्ली (४४)५. पुणे ते दिल्ली (७२)६. दिल्ली ते हैद्राबाद (७५)७. मुंबई ते गोवा (७९)८. दिल्ली ते चेन्नई (८८)९. मुंबई ते दुबई (९४)१०. मुंबई ते चेन्नई (९७)