--
आव्हाळवाडी : दिघी स्टेशनला कार्यरत असणाऱ्या पोलीस शिपायाने शिवीगाळ करून प्लास्टिक खुर्च्यांनी मारहाण केल्याप्रकरणी पोलीस शिपाई अमोल जाधव यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी वाघोली येथील लक्ष्मण भिवा पाथरकर यांनी एका तक्रार आर्जाद्वारे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त यांचेकडे केली आहे.
याबाबत माहिती अशी की लक्ष्मण पाथरकर (रा. वाघोली ता. हवेली) यांचेसह अन्य जणांवर एक महिन्यापूर्वी सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. सामजिक सुरक्षा रक्षक विभागाने केलेल्या कारवाईमध्ये जप्त केलेल्या वस्तू दिघी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी (दि १७ डिसेंबर) रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास पाथरकर यांचेसह त्यांचे इतरही गेले होते. सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईबाबत सर्वांना न्यायालयात नेणार होते. परंतु न्यायालयात जाण्यापूर्वी दिघी येथे कार्यरत असलेले अमोल जाधव यांनी रेस्टरूम नेऊन कुठलीही चौकशी न करता शिवीगाळ करून हाताने व खुर्च्यांनी मारहाण केली यामध्ये हाताला व डोक्याला दुखापत झाली असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. न्यायालयात हजार करण्यापूर्वी न्यायालयात मारहाणीबद्दल सांगितल्यास तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून तडीपार करील अशी धमकी जाधव यांनी दिली असल्याचे असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. न्यायालयातून आल्यानंतर हाताला व डोक्याला वेदना होत असल्यामुळे वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेल्यानंतर डॉक्टरांनी एक्स-रे काढून औषधी-गोळ्या दिल्या असल्याचे पाथरकर यांनी तक्रारीत दाखल केले आहे. मारहाण करणाऱ्या शिपायाची सखोल चौकशी कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाथरकर यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांसह गृहमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे. पोलीस शिपाई अमोल जाधव यांचेशी संपर्क केला प्रत्येक्ष भेटून बोलू असे सांगून माहिती देण्यास टाळले.