दौंड शहर आणि परिसरात कोरोना लसीकरणाचे काम शासकीय पातळीवर सुरु आहे. दरम्यान लसीकरण केल्याने ज्येष्ठ नागरिकांना ञास होतो, लसीकरण केल्यावर किमान चार ते पाच दिवस घरी थांबावे लागते, लसीकरणाचा विपरीत परिणाम होतेय, अशी अफवा पसरविली जात आहे. या अफवा कोण पसरवत आहे त्याचा पोलिसांनी तसेच आरोग्य खात्याने शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी . मी स्वत: ज्येष्ठ नागरिक आहे तेव्हा मी कोरोना लसीकरण केले. मात्र मला कुठलाही त्रास झालेला नाही. समाजातील काही अपप्रवृत्तीचे लोक लसीकरणाबाबत अफवा पसरवीत आहे. अशा अपप्रवृत्तीच्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे ॲड. बलदोटा यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोना लसीकरणाबाबत अफवा पसरवित आहे. त्यांचा शोध घेण्याचे कामकाज सुरू आहे. जर एखादी व्यक्ती अफवा पसरविताना सापडली तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी म्हटले आहे.
साडेतीन हजार रुग्णांना लसीकरण
दौंड उपजिल्हा रुग्णालयात महिन्याच्या कालावधीत ३ हजार ५६८ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये २४७ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. दररोज बऱ्यापैकी नागरिकांना लसीकरण केले जात असल्याचे वैद्यकीय अधीक्षक संग्राम डांगे यांनी सांगितले.